शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अकोला शहरात २०१५पासून उभारलेल्या अनधिकृत इमारतींचे हाेणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:45 IST

Akola city News : नगररचना विभागातील काही प्रभारी अधिकारी व झाेनमधील कनिष्ठ अभियंते काही बांधकाम व्यावसायिकांच्या दावणीला बांधले गेल्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे.

- आशिष गावंडे

अकोला: मागील काही दिवसांपासून उच्चभ्रू नागरिकांचे टाेलेजंग बंगले, प्रभावी राजकारणी व बाेटावर माेजता येणाऱ्या बड्या बिल्डरांच्या वाणिज्य संकुलांना तातडीने परवानगी देण्यासाठी महापालिकेचा नगररचना विभाग कमालीचा कर्तव्यतत्पर झाल्याचे दिसून येत आहे. नगररचना विभागातील काही प्रभारी अधिकारी व झाेनमधील कनिष्ठ अभियंते काही बांधकाम व्यावसायिकांच्या दावणीला बांधले गेल्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी शहरात २०१५ पासून उभारलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतील नगररचना विभागाच्या आशीर्वादामुळे नियम धाब्यावर बसवत शहरात खुलेआम अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. शहरातील उच्चभ्रू नागरिक, राजकीय नेते व माेजक्या बांधकाम व्यावसायिकांच्या वाणिज्य संकुलाच्या बांधकामाला नगररचना विभागाकडून विलंब न करता तातडीने परवानगी दिली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घर बांधकामाला परवानगी देताना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी नियमांची लांबलचक यादी दिली जात आहे. आज राेजी शहरात वाणिज्य संकुलांची माेठ्या प्रमाणात बांधकामे केली जात असून, जाेत्यापर्यंत (प्लिन्त) व पार्किंगसाठी खाेदकामाची परवानगी दिल्यानंतर त्या बांधकामाकडे नगररचनातील कनिष्ठ अभियंत्यांकडून ढुंकूनही पाहिल्या जात नसल्याची माहिती आहे.

 

मनपा आयुक्तांची दिशाभूल

बांधकामाच्या परवानगीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर केल्यानंतर याच प्रणालीमार्फत कागदपत्रांची पूर्तता केली जाते. याठिकाणी काही विशिष्ट फायली त्रुटी न काढताच तातडीने मंजूर केल्या जात आहेत. आज राेजी या विभागात कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून अर्थपूर्ण व्यवहार पार पडत असताना मंजूर केलेल्या फायलींसंदर्भात मनपा आयुक्तांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे.

 

दक्षिण झोनमध्ये नियम पायदळी

दक्षिण झाेनमधील गाेरक्षण राेडलगत मनपाने वाणिज्य संकुल उभारण्यासाठी परवानगी दिलेल्या मालमत्ताधारकाने नियम पायदळी तुडवत वाहनतळासाठी खोदकाम केले. वाणिज्य संकुलाची फाइल तयार करण्यापासून ते परवानगी मिळवून देण्यापर्यंत नगररचना विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने माेलाची भूमिका वठविल्याची माहिती आहे.

 

झाेन अधिकाऱ्यांवर जबाबदारी

मनपा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरही अनेक बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्षात नियमांपेक्षा कितीतरी पट जास्त अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे शहरात २०१५ पासून उभारण्यात आलेल्या सर्व वाणिज्य संकुलांची माहिती जमा करून सादर करण्याची जबाबदारी झाेन अधिकाऱ्यांवर साेपविण्यात आली आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या ताेंडचे पाणी पळाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला