शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पावसाळ्यातही कुपोषित बालकांचा पोषण आहार पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 11:10 IST

अकोला: जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात उपचारासह दिल्या जाणाऱ्या ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिसिअस फूड’ या आहार देण्यात ऐन पावसाळी महिन्यात खंड पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात उपचारासह दिल्या जाणाऱ्या ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिसिअस फूड’ या आहार देण्यात ऐन पावसाळी महिन्यात खंड पडला आहे. ८२ बालकांच्या वजनात वाढ करण्यासाठी असलेल्या या पूरक पोषण आहाराचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आदेश आधीच दिला आहे. डिसेंबर २०१८ पासून दिल्या जाणारी औषध पावडर सातत्याने १२ आठवडे देऊन त्याच्या परिणामाची तपासणी करण्याचेही शासनाने ठरविले होते, हे विशेष.पावसाळ्यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. काही प्रमाणात बालमृत्यूही वाढतात. ही बाब आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी आव्हानात्मक ठरते. त्यातच जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. जिल्ह्यात कुपोषित बालकांचा नव्याने शोध घेण्यात आला. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये डिसेंबर २०१८ अखेर जिल्ह्यातील आठही प्रकल्पांत १०२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे पुढे आले. त्यापैकी तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांवर उपचार करण्याची सोय ग्राम बालविकास केंद्रात करण्यात आली. या केंद्रातील सकस आहार व औषधाचा खर्च भागविण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच ‘व्हीसीडीसी’चा निधी देण्यात आला. तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येनुसार जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्चित झाली. बालकांवर केंद्रात उपचार सुरू आहेत.दरम्यान, शासनाने बालकांचे वजन वाढविण्यासाठी औषध पावडरचा पुरवठा सुरू केला. त्यावेळी डिसेंबरपासून १२ आठवड्यांसाठी ९६६० पाकिटांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे झाला. १२ आठवड्यांनंतर बालकांच्या वजनात किती फरक पडतो, त्यावरून पुढील पुरवठाही निश्चित झाला. त्यानुसार संस्थेला सातत्याने पुरवठा आदेश दिला जात आहे. तरीही संस्थेकडून पुरवठा करण्यात विलंब होत असल्याचा प्रकार घडत आहे.

राजकीय व्यक्तींच्या मर्जीतील संस्थासर्वोच्च न्यायालयाने बालकांचा पूरक पोषण आहार पुरवठ्यात काही ठरावीक संस्थांच्या मक्तेदारीवरच प्रश्न निर्माण केला. त्यानुसार संबंधित संस्थांची चौकशी करण्याचेही बजावले. त्यामध्ये ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिसिएस फूड’चा पुरवठा करणारी संस्थाही आहे. महालक्ष्मी महिला औद्योगिक व बालविकास बहूद्देशीय संस्था, नांदेड या संस्थेकडे अनेक जिल्ह्यांतील पुरवठ्याचे काम आहे.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य