शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 09:55 IST

रुपेंद्र गोरे यांना निलंबित करण्याचा आदेश महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी गुरुवार, २५ जून रोजी दिला आहे.

पारस : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेचे कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्याचा ठेपका ठेवत वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता तथा उपमुख्य अभियंता रुपेंद्र गोरे यांना निलंबित करण्याचा आदेश महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी गुरुवार, २५ जून रोजी दिला आहे.पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता तथा उपमुख्य अभियंता रुपेंद्र गोरे यांचे चिरंजीव रूचांग रुपेंद्र गोरे यांच्या नावाने असलेल्या श्री साई इंटरप्राईजेस या एंटरप्राइजेसला फ्लाय अ‍ॅश उचलण्याचा कंत्राट देऊन अधीक्षक अभियंता रुपेंद्र गोरे यांनी पदाचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उचलण्यात आला आहे. श्री साई इंटरप्राईजेसने आतापर्यंत २०० मेट्रिक टन राखेची उचल केली आहे. त्यामुळे स्वत:च्या मुलाच्या व्यवसायाची वृद्धी होण्याकरिता अधीक्षक अभियंता रुपेंद्र गोरे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निलंबन पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.सदर प्रकार हा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी सेवा वि. नियम २०१५ नुसार कर्मचारी वर्तणूक, शिस्त, सेवा विनियम क्रमांक ८५ सर्वसाधारण, (ढ) (१) अन्वये मंडळाची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही व्यापार करीत असेल किंवा त्या व्यक्तीच्या नावावर विम्याचा किंवा दलालीचा व्यवसाय असेल तर सक्षम अधिकाºयास तसे कळविले पाहिजे, अशी कंपनीच्या अधिनियमामध्ये तरतूद आहे. गोरे यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत कंपनीस कळवलेले नसल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपणास हा निलंबन आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करीत असल्याचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाParas Thermal Powerपारस वीज निर्मिती केंद्रsuspensionनिलंबन