शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

तूर, हरभरा अनुदानासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:57 IST

अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान येणार आहे

ठळक मुद्देराज्यात तूर व हरभरा खरेदी संथ गतीने करण्यात आली असून, खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करण्यात आली. राज्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या १२ लाख २० हजार ६८४ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी बाकी आहे. खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला.

- संतोष येलकरअकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान येणार आहे. दोन हेक्टर मर्यादेत अनुदान देण्यात येणार असून, शेतकºयांना अनुदान देण्यासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीत खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामात जागा उपलब्ध नसल्याने, राज्यात तूर व हरभरा खरेदी संथ गतीने करण्यात आली असून, खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करण्यात आली. त्यामुळे पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना तूर व हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागली. राज्यात गत १५ मेपासून तूर खरेदी आणि १३ जूनपासून हरभरा खरेदी नाफेडमार्फत बंद करण्यात आली. खरेदी बंद करण्यात आल्यानंतर राज्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या १२ लाख २० हजार ६८४ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी बाकी आहे. त्यानुषंगाने नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांना अनुदान वाटप करण्यासाठी १० क्विंटल हेक्टरी मर्यादा निश्चित करण्यात आली असून, दोन हेक्टर मर्यादेत अनुदान वाटप करण्याचा निर्णय १९ जून रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार नोंदणी केलेल्या; परंतु खरेदी बाकी असलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी १० क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान मिळणार आहे.राज्यात तूर-हरभरा खरेदी बाकी असलेले असे आहेत शेतकरी!-तूर खरेदी बाकी असलेले शेतकरी : ९२२०७६-हरभरा खरेदी बाकी असलेले शेतकरी : २९८६०८......................................................................एकूण :                 १२२०६८४अनुदानासाठी ‘ते’ शेतकरी ठरणार अपात्र!आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना तूर ‘एसएमएस’ पाठविला; मात्र ठोस कारण नसताना संबंधित शेतकºयांनी खरेदी केंद्रांवर तूर आणली नाही, अशा शेतकºयांना तूर अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी