शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांच्या आकृतिबंधाचा अहवाल सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:48 IST

अकोला : राज्यात महापालिकांचा आस्थापना खर्च वाढत  चालला असतानाच प्रशासकीय कामकाजात सुधारणा होत  नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील  कर्मचार्‍यांची संख्या, ते कोणत्या संवर्गात कार्यरत असण्यासोब तच तांत्रिक-अतांत्रिक पदांवरील कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी  मनपाचा आकृतिबंध तयार नसल्याच्या ‘लोकमत’मधील  वृत्ताची दखल घेत, नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी राज्यातील महापालिकांच्या  आकृतिबंधाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बुधवारी नगर  विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. 

ठळक मुद्देनगर विकास राज्यमंत्र्यांचे प्रधान सचिवांना निर्देशप्रभाव लोकमतचा

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात महापालिकांचा आस्थापना खर्च वाढत  चालला असतानाच प्रशासकीय कामकाजात सुधारणा होत  नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील  कर्मचार्‍यांची संख्या, ते कोणत्या संवर्गात कार्यरत असण्यासोब तच तांत्रिक-अतांत्रिक पदांवरील कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी  मनपाचा आकृतिबंध तयार नसल्याच्या ‘लोकमत’मधील  वृत्ताची दखल घेत, नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी राज्यातील महापालिकांच्या  आकृतिबंधाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बुधवारी नगर  विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. महापालिकेची २00४ पासून बिंदू नामावली अद्ययावत  नसल्यामुळे ती तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश अनुसूचित  जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल यांनी २0१५ मध्ये  मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुषंगाने मनपा आयुक्त अजय  लहाने यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे बिंदू  नामावलीचा प्रस्ताव सादर केला असता विभागीय आयुक्तांनी  बिंदू नामावली मंजूर करीत सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली.  यादरम्यान, मनपाच्या आस्थापनेवर एकूण कर्मचार्‍यांची संख्या  व उपलब्ध मनुष्यबळाची तफावत ध्यानात घेऊन कार्यरत  कर्मचारी नेमके आहेत तरी किती, याची इत्थंभूत माहिती  घेण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी  आकृतिबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मनपाच्या  प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचे काम कर्मचारी पार पाडत  असले, तरी संबंधित विभागातील कर्मचारी नेमक्या कोणत्या  पदांवर आणि संवर्गात आहेत, याकरिता आकृतिबंध तयार  असणे अपेक्षित आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने ही प्रक्रिया  सुरू केली होती. कालांतराने ही प्रक्रिया ठप्प पडली. या संदर्भा तील वृत्त लोकमतध्ये उमटताच नगर विकास राज्यमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी नगर  विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना राज्या तील महापालिकांच्या आकृतिबंधाचा अहवाल सादर करण्याचे  निर्देश दिले आहेत. 

मनपाची घडी विस्कटलेली!महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग, सार्वजनिक बांधकाम, जल प्रदाय, नगररचना विभाग, शिक्षण विभाग, कोंडवाडा, अ ितक्रमण विभाग, अग्निशमन विभाग, अर्थ व वित्त विभाग,  आरोग्य व स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आदी विभागांमध्ये  पात्रता नसणार्‍या कर्मचार्‍यांकडे महत्त्वाचे पदभार सोपविण्यात  आले आहेत. त्यांच्या अधिनस्थ किती कर्मचारी कोणत्या पदांवर  कार्यरत आहेत, याची निश्‍चित आकडेवारी प्रशासनाकडे उ पलब्ध नाही. याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होतो. ही  परिस्थिती राज्यात सारखीच आहे, हे येथे उल्लेखनीय.