शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीचा आराखडा द्या : सर्वोच्च न्यायालयाचे शासनाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 15:38 IST

कृती आराखडा २८ आॅगस्ट रोजी न्यायालयासमोर ठेवण्याचे बजावले आहे. त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रियाच न्यायालयासमोर ठेवावी लागणार आहे.

अकोला : राज्यातील पाच जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य शासन, आयोगाने संयुक्तपणे चार महिन्यांचा अवधी मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रस्तावाची उलटतपासणी केली. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी काय केले जाईल, त्याबाबतचा आराखडा २८ आॅगस्ट रोजी सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्तीद्वय खानविलकर, माहेश्वरी यांच्या पीठाने दिले. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात राज्य शासन, आयोगाच्या संयुक्त बैठकीनंतरचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुद्यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली.राज्यातील अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार व नागपूर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने ३१ जुलै रोजी काढला. राज्य शासनाच्या अध्यादेशामुळेही जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिकच होणार आहे. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देण्यासाठी या प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती शासनाकडून मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने राज्य शासनाला आदेशित करीत ८ आॅगस्टपर्यंत या मुद्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे बजावले. त्यानुसार राज्य शासनाच्यावतीने अ‍ॅड. मेहता यांनी न्यायालयात केवळ मुख्यमंत्र्यांचे पत्र सादर केले. त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. याप्रकरणी शासन, निवडणूक आयोगाने संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा, त्याची माहिती १४ आॅगस्ट रोजीच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असे न्यायालयाने बजावले होते. त्यानुसार सुनावणीमध्ये निवडणूक घेण्यास किमान चार महिने लागतील, असे सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेची पडताळणी केली. आराखड्यानुसार निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी शासन, आयोग काय करणार आहे, याचा कृती आराखडा २८ आॅगस्ट रोजी न्यायालयासमोर ठेवण्याचे बजावले आहे. त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रियाच न्यायालयासमोर ठेवावी लागणार आहे.याप्रकरणी आयोगाकडून अ‍ॅड. करढोणकर, याचिकाकर्त्यांपैकी विकास गवळी यांच्यावतीने अ‍ॅड. मुकेश समर्थ, अनघा देसाई व सत्यजित देसाई यांनी बाजू मांडली.

 लोकसंख्येची माहिती कधीपर्यंत मिळणार!प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) मिळून नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा निश्चित होतील; मात्र त्यासाठी जनगणनेची आकडेवारीच उपलब्ध नाही. लोकसंख्येची निश्चित आकडेवारी नसल्याने या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित कराव्या, हे स्पष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे ही माहिती कधीपर्यंत उपलब्ध करणार आहात, याची माहितीही न्यायालयात द्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSupreme Courtसर्वोच्च न्यायालय