शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाचा अहवाल सादर करा! - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:54 IST

अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना दिला.

अकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर पीक नुकसानाची पाहणी करून, प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना सोमवारी दिला.पावसाळा संपला असला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. रविवार, २७ आॅक्टोबर रोजीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, सोमवार, २८ आॅक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने कापणी व काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी करून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाºयांना दिला.पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा !परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाच्या पृष्ठभूमीवर, पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुका कृषी अधिकाºयांकडे विहित नमुन्यात अर्ज करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी केले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुुकसान झाले आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाची पाहणी करून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना दिला आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी