शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विषय शिक्षक अद्यापही कार्यरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:20 IST

सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विषय सहायक म्हणून प्रतिनियुक्ती दिल्याने ती रद्द करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला. त्यानंतरही काही शिक्षक कार्यरत असून, त्यांना कार्यमुक्त न केल्यास शिक्षण हक्क अधिनियमातील कलम २७ नुसार शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले विषय सहायक, समुपदेशकांना गत अनेक वर्षांपासून तेथेच ठेवले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेसह शासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला होता; मात्र कार्यवाही झाली नाही. त्यानंतर थेट राज्य शासनाकडेच तक्रारी झाल्याने शिक्षण संचालकांनी ३० एप्रिल रोजी त्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश दिला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या विषय सहायक, समुपदेशकांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर रुजू करावे, यासाठी ३० एप्रिल रोजीच कार्यमुक्त करण्याचे बजावले. शिक्षण संचालकांनी त्यासोबत यादीही दिली. त्यामध्ये विषय सहायक गोपाल सुरे, दिनेश बोधनकर, जितेंद्र काठोळे, संदीप वरणकार, तृप्ती देशपांडे, निवृत्ती राऊत, शेख राजू शेख चांद, गणेश राऊत, भीमसिंग राठोड, समुपदेशक हेमंत पदमने व नीता जाधव यांचा समावेश आहे. त्यापैकी काही शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. कार्यकारी समिती स्थापन करून त्यांच्या त्यामध्ये समावेश करण्यात आला. या प्रकाराने शिक्षण हक्क कायद्यातील कलम २७ नुसार तरतुदींचा भंग होत आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे अद्यापही कार्यरत शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक