शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये घराणेशाही नाही - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:43 IST

​​​​​​​अकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार,    पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष      देशमुख  यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ठळक मुद्देपक्षाला नवसंजीवनी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष      देशमुख  यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शुक्रवारी भाजप कार्यालयात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी काँग्रेस, राकाँतील ध्येयधोरणांचा चांगलाच   समाचार घेतला. निष्ठावान कार्यकर्ता हा भाजपाचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाचे काम सुरू राहते. याचा विसर इतर राजकीय पक्षांना  पडल्यामुळेच भाजपमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. पक्षाचा विस्तार होत असताना पक्ष नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पुढील वाटचाल सुरु ठेवण्याचे आवाहन सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना केले. यावेळी ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सहकार मंत्र्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी मनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, माजी आ. जगन्नाथ ढोणे, माजी महापौर सुमनताई गावंडे , चंदा शर्मा , सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, योगीता पावसाळे, नंदा पाटील, रंजना विंचनकर, जयश्री दुबे, प्रा. उदय देशमुख, राजेश नागमते, रामदास तायडे , हरीश आलीमचंदानी, सतीश ढगे, अनुप गोसावी, डॉ. संजय शर्मा, श्रीकृष्ण मोरखंडे, रवी गावंडे, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, अनिल गावंडे, राजेश रावणकर, प्रकाश श्रीमाणे, गणेश कंडारकर , दिगंबर गावंडे, हरीश आमनकर, दिलीप सांगळे आदी उपस्थित होते.

पक्षाला नवसंजीवनी!पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून भाजप कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांच्या उसाची खरेदी न करणे, हमी भाव न देणे, बँकाँमधून कर्ज उपलब्ध न होऊ देणे, अशाप्रकारे भाजप कार्यकर्त्यांचा छळ केला. कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रामाणिक काम केल्यामुळे सोलापूर महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकला असल्याचे ना.सुभाष देशमुख यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात भाजपाची तटबंदी मजबूत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखAkola cityअकोला शहरBJPभाजपा