शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सॅनिटायझर, मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:23 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

अकोला : राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत; परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सदर साहित्य खरेदीच्या बाबतीत प्रस्ताव तयार करण्याच्या मुद्यावरून आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या अनुषंगाने इयत्ता नववी, दहावी ते अकरावीपर्यंतच्या शाळा १ जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना होत्या; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यादरम्यान, राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्राथमिक स्तरावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये हालचाली सुरू झाल्या; परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे आॅनलाइन प्रणालीचा वापर करून किंवा शिक्षकांना थेट त्यांच्या वस्तीमध्ये पाठवून शिकवणुकीचे पर्याय वापरल्या जात आहेत. अशा स्थितीमध्ये शाळांमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे त्यांच्यासाठी साहित्याची खरेदी कशी करायची, त्याचे प्रस्ताव कसे तयार करायचे, या मुद्यावरून राज्यभरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या