हिंगणी बु.(अकोला) बी.कॉम.अंतिम वर्षाच्या परिक्षेत नापास होण्याच्या भितीने हिंगणी बु येथील २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. शुभम मुरलीधर भोंडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.हिंगणी बु येथील शुभम बोंडे हा युवक अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात बी.कॉम अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने बी.कॉम.अंतिम वर्षाची दिली असून त्याचे पेपर चांगले गेले नव्हते. येत्या काही दिवसात बी.कॉमचा निकाल लागणार असून आपण या परीक्षेत नापास होउ अशी भिती शुभम बोंडेला होती. या भितीतूनच त्याने १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मृतक युवकाचा खिशात एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये बी.कॉमचे पेपर चांगले न गेल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:32 IST
त्या काही दिवसात बी.कॉमचा निकाल लागणार असून आपण या परीक्षेत नापास होउ अशी भिती शुभम बोंडेला होती.
नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या
ठळक मुद्दे शुभम मुरलीधर भोंडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात बी.कॉम अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.