शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करा ‘इझी टेस्ट अ‍ॅप’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:42 IST

हे अ‍ॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह शाळांना लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.

अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आॅनलाइन ‘इझी टेस्ट अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. हे अ‍ॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह शाळांना लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.तंत्रज्ञानाचे युग आहे आणि सर्वत्र स्मार्ट मोबाइल फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे आॅनलाइन कलमापन चाचणीसुद्धा मोबाइलवर घेण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला घेऊन पालकही गंभीर आहेत. पाल्यांना परीक्षेत चांगले यश मिळावे, यासाठी पालक खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांना लावून देतात. आता शिक्षण विभागानेसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षेचा सराव व्हावा, शिष्यवृत्ती परीक्षेला शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत, पालकांमध्येसुद्धा जागृती व्हावी, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाने आॅनलाइन ‘इझी टेस्ट अ‍ॅप’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीसुद्धा याच अ‍ॅपच्या माध्यमातून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घटक चाचणी घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज रात्री ८ वाजता एका विषयावर आॅनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीक्षेपर्यंत प्रत्येक रविवारी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सराव पेपर या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संबंधित शिक्षक व पालकांनी आपल्या मोबाइलवर इझी टेस्ट अ‍ॅप डाउनलोड करून विद्यार्थ्यांकडून पेपर सोडवून घ्यावेत, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.

गतवर्षी इझी अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा आणि अभ्यास मार्गदर्शनाचा उपक्रम राबविला होता. यंदासुद्धा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इझी टेस्ट अ‍ॅपद्वारे आॅनलाइन व्हिडिओ, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी