शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांंनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:04 IST

लोकमतच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधत सोमवारी महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला.  ‘लोकमत’ ने या चिमुकल्यांना  पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली.

ठळक मुद्देमान्यवरांशी साधला संवाद लाइव्ह रिपोर्टिंगचाही घेतला अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकमतच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधत सोमवारी महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला.  ‘लोकमत’ ने या चिमुकल्यांना  पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील काम कसे चालते, बातम्या कशा मिळविल्या जातात, मुलाखती कशा घेतात, अशा काही गोष्टींचा उलगडा विद्यार्थ्यांंना झाला.  एक दिवस प्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांंची नावे पाठविण्याचे आवाहन अकोल्यातील शाळांना करण्यात आले होते. त्यानुसार अकरा विद्यार्थी सकाळी अकरा वाजता ‘लोकमत’ मध्ये उपस्थित झाले. लोकमतचे निवासी संपादक रवी टाले यांनी सर्वांंचे स्वागत करून लोकमत संदर्भात प्राथमिक माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांंनी एकमेकांचा परिचय करून घेतला. प्रत्येकाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे, पत्रकार म्हणून कुणाला भेटायला आवडेल, तुम्हाला कोणते प्रश्न पडतात, अशी चर्चा संपादकीय सहकार्‍यांसोबत करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांंमधून बाल शिवाजी शाळेची मानसी  राऊत हिला अतिथी संपादकाची जबाबदारी देण्यात आली. अतिथी संपादक मानसी अरूण राऊत हिने सर्व संपादकीय सहकार्‍याची बैठक घेत सर्व सहकार्‍यांना ‘लोकमतचे ओळखपत्र’ दिले व प्रत्यक्ष फिल्डवर पाठविण्यात आले. भारत विद्यालयाची सनिका अनिल चतुरकर व बाल शिवाजीचा यश उज्ज्वल खुमकर यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्यासोबत संवाद साधून त्यांना अनेक प्रश्नांवर भंडावून सोडले. सन्मित्र पब्लिक स्कूलची अपूर्वा शिवाजी ढगे, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजूचा विद्यार्थी अनिकेत राऊत या दोघांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची भेट घेऊन चर्चा केली. तेथून बाहेर पडत असतानाच एक अपघात झाल्याची माहिती मिळताच या दोघांनी संपादकीय सहकार्‍यासोबत अपघात स्थळी धाव घेऊन तेथील रिपोर्टिंंगचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जागृती विद्यालयाचा यश मानकर याने जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. स्वामी विवेकानंद स्कूलची गौरी धनराज कांगटे, जिजाऊ कन्या शाळेची स्नेहा रमेश मेटकरी व दुर्गा संजय भोजने यांनी महिला बालकल्याण अधिकारी योगेश जवादे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तर अतिथी संपादक मानसी राऊत, जय संजय झापे यांनी लोकमत कार्यालयात ‘दप्तरांचे ओझे कधी संपणार?’ या विषयावर परिचर्चा घेतली. तर प्रभात किड्सची सानिका जुमळे व डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेचा ऋषिकेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारून तेथील कामाचा अनुभव घेतला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा लोकशाही दरबार सुरू होता. त्या कामाची माहिती घेतली. असा सर्व अनुभव घेत या विद्यार्थ्यांंनी लोकमत कार्यालयात येऊन त्यांचे अनुभव सर्वांंसोबत शेअर केले. आपल्याच शब्दात या अनुभवांना शब्दबद्ध करून लोकमतमधील संपादकीय सहकार्‍यांना त्याची प्रत दिली. संपूर्ण दिवसभर पत्रकारितेच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभाग घेत या विद्यार्थ्यांंनी घेतलेला अनुभव हा त्यांच्यासाठी रोमांचकारी ठरल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांंनी दिल्या. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी ‘लोकमत’ राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांंंना प्रत्यक्ष अनुभवाचे दालन खुले करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

टॅग्स :reporterवार्ताहरStudentविद्यार्थी