शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, तरुणाईने सादर केला मनाला भुरळ घालणारा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:52 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय युवा महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला .

अकोला : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय युवा महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला असून, विद्यार्थी, तरुणाईने मनाला भुरळ घालणाऱ्या नृत्य, गीत-गायनासह विविध कलाकुसर सादर केली. यातूनच विद्यार्थ्यांच्या जीवनात नव्या दिशेने भरारी घेण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत असून, अशा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य तथा राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार निर्माण झाल्यास विद्यापीठाचा लौकिक निश्चितपणे वाढेल, असा आशावाददेखील डॉ. भाले यांनी व्यक्त केला. डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. पी. आर. कडू, डॉ. वाय. बी. तायडे, डॉ. आर. जी. देशमुख, महोत्सवाचे प्रमुख आयोजक डॉ. एस. एस. माने यांच्यासह आयोजन समिती अध्यक्ष डॉ. एम. व्ही. तोटावार यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. तोटावार यांनी केले. संचालन डॉ. प्रज्ञा कदम यांनी केले. डॉ. राजेश्वर शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज समारोपडॉ. पंदेकृविच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित तीन दिवसीय युवा महोत्सवाचा समारोप शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. युवा महोत्सवामध्ये १५ कृषी महाविद्यालये सहभागी झाली असून नृत्य, शास्त्रीय संगीत, रांगोळी, क्ले मॉडेलिंग, चित्रकला, वादविवाद आदी स्पर्धांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठStudentविद्यार्थीAkolaअकोलाcultureसांस्कृतिक