शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

प्रबोधना सोबत कठोर कार्यवाही करणे आवश्यक! - खासदार संजय धोत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 5:22 PM

अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

ठळक मुद्दे२९ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटन श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले.  पंधरवाडयात उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार. मार्गदर्शन पुस्तीका ,पोस्टर, स्टिकर्स यांचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. वाहतुकीचे नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून रस्त्यावरुन वाहन चालवीताना अपघात टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मोटार वाहन विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांनी आयोजीत केलेल्या २९ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटन श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार रणधीर सावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे वाहतुक पंधरवाडयाचे थिम असुन २३ एप्रिल ते ७ मे २०१८ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या पंधरवाडयात उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी प्रास्तावीकातून दिली. यावेळी श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मार्गदर्शन पुस्तीका ,पोस्टर, स्टिकर्स यांचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नो हॉर्न प्लीज ची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन श्री. घोरपडे यांनी तर उपस्थितांचे आभार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी मानले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी व अधिकारी ,व एन.सी.सी/एन.एस.एस चे विद्यार्थी, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी/विद्यार्थींनी आणि अद्यापक वर्ग उपस्थित होते.नियम कठोरपणे राबविणे गरजेचे - सावरकरपरिवहन विभागाने वाहतुकीचे नियम कठोरपणे राबविण्याची गरज असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध र दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले. शहरातील महत्वाच्या चौकात रस्त्यांचे कर्व्हेचर मनपाच्या मतदतीने तयार करावे,अशा सुचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या. लायसन्स काढण्याचे प्रणालीमध्ये असलेल्या पारदर्शक पणामुळे लायसन्स काढणे अधिक सोपे झाल्यामुळे त्यांनी या प्रणालीचे कौतुक केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीसSanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकर