शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 21:59 IST

अकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५  जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर होळी करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचारी सहकुंटुंब आक्रोश आंदोलन करणार आहे. त्यानंतर बेमुदत संपाची घोषणा करण्यात येईल. असा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर जाहिर करण्यात आला.

ठळक मुद्दे२५ जानेवारीला राज्यभरातील आगारांमध्ये करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी ९ फेब्रुवारीला सहकुंटुंब आक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५  जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर होळी करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचारी सहकुंटुंब आक्रोश आंदोलन करणार आहे. त्यानंतर बेमुदत संपाची घोषणा करण्यात येईल. असा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर जाहिर करण्यात आला. वेतन वाढ पोटी १0७६  कोटींचा शासनाचा  प्रस्ताव कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने फेटाळून लावित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी  मध्यतंरी चार दिवस चक्काजाम  केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली. दरम्यान या समितीने वेतन पोटी ७४१ कोटींचा प्रस्ताव समोर आणला.  पूर्वीपेक्षाही कमी वेतनवाढ समितीने आणल्याने हा प्रस्ताव कर्मचारी कृती समितीने फेटाळला. दरम्यान कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी मुंबईत बैठक बोलाविली. त्यामध्ये उच्चस्तरीय समितीचा अहवाल निराशाजनक व संतापजनक आहे, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाचे टप्पे आणि भूमिका निश्‍चीत करण्यात आली आहे. आपल्या न्यायहक्कासाठी कर्मचारी कृती समिती गुरुवारी दि.२५ जानेवारी रोजी राज्यभरातील आगारांमध्ये उच्चस्तरीय अहवालाची होळी करणार आहे. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास ९ फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या बैठकीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAkola Bus Standअकोला बस स्थानक