शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
3
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
4
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
5
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
6
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
7
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
8
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
9
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
10
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
11
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
12
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
13
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
14
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
15
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
16
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
17
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
18
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
19
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
20
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

सावरा फाट्यावर शेतक-यांचा ‘रास्ता रोको’

By admin | Updated: June 5, 2017 02:07 IST

बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने अकोट-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अकोट : अकोट-अमरावती मार्गावरील सावरा फाट्यावर अचानक रविवारी शेतकर्‍यांनी ह्यरास्ता रोकोह्ण आंदोलन केले. यावेळी बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. सावरा पंचक्रोशीतील मंचनपूर, आसेगाव, देऊळगाव, कवठा, पुंडा, रंभापूर आदी गावांतील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सरकारविरोधी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आसेगाव बाजार येथील युवा शेतकरी संजय पुंडकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी सात-बारा कोरा करा, दुधाला योग्य भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शासनाने पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी, शेतीसाठी अखंड मोफत वीज पुरवठा व ठिबक सिंचनला अनुदान मिळावे आदी मागण्यांकरिता आंदोलन छेडण्यात आले. ह्यरास्ता रोकोह्णमुळे एकच खळबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडकून पडली होती. आठवडी बाजारात अकोटला जाणारे व्यापारीसुद्धा अडकले होते. यावेळी शेतकर्‍यांनी अत्यावश्यक सेवा असलेली वाहने जाऊ दिली. आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकरी, शेतमजूर गावकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने अडकून पडलेल्यांनी नि:श्‍वास टाकला.पोलिसांचे वरातीमागून घोडेसावरा फाट्यावर शेतकर्‍यांनी अचानक एकत्र येऊन रास्ता रोको केला. या आंदोलनाची भनक नसल्याने पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. रस्त्यावर बैलबंडी व जनावरे असल्याने प्रारंभी रास्ता रोको असल्याचे कोणाच्याही लक्षातच आले नाही. जनावरे व बैलबंडीमुळे वाहतूक विस्कळीत झाली, असे वाहनधारकांना वाटल्याने वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या; परंतु नंतर शेतकर्‍यांनी घोषणा देत कांदे रस्त्यावर फेकले, पुतळा जाळल्याने शेतकरी आंदोलन असल्याचे समजले. याबाबतची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अब्दागिरेसह पोलीस पोहोचले; मात्र तोपर्यंंत आंदोलन संपले होते. अखेर पोलिसांनी परत येऊन आंदोलनाची पोलीस डायरीत नोंद घेतली.शेतकर्‍यांच्या संपास शेकापचा पाठिंबा अकोला : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारणार्‍या राज्यातील शेतकर्‍यांच्या आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शेतकरी वर्ग कमालीचा आर्थिक अडचणीत असून, कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. हमीभावात माल खरेदी करायला सरकार तयार नाही. अशा परिस्थितीत तातडीचा उपाय म्हणून सरसकट कर्जमाफी ही शेतकर्‍यांची मागणी आहे; परंतु सरकार याबाबत गंभीर नसून, टाळाटाळ करीत असल्यामुळे शेतकर्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या या संपास व आंदोलनास शेकापचा पूर्ण पाठिंबा असून, या संपात शेकापच्या कार्यकर्त्यांंनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे विदर्भ विभाग चिटणीस प्रदीप देशमुख व जिल्हा चिटणीस दिनेश काठोके यांनी केले आहे.