लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका देशी दारूच्या दुकानातून चोरलेली तब्बल ५५ हजार रुपयांची देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आतच जप्त केली. या प्रकरणातील दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी दारू चोरीची कबुली दिल्याची माहिती आहे.शंकरनगरातील देशी दारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी १८0 एमएलचे दोन बॉक्स, ९0 एमएलचे १२ बॉक्स व १४ देशी दारूचे बॉक्स तसेच रोख ९ हजार २५0 रुपये, असा एकूण ५५ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. दुकानाचे व्यवस्थापक कुंदन किशोर पटेल (२७, रा. मारो तीनगर) यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या चोरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच, त्यांनी सदर प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरलेली दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात शक्ती कांबळे व कर्मचार्यांनी केली.
चोरलेली दारू २४ तासांच्या आत हस्तगत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:34 IST
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका देशी दारूच्या दुकानातून चोरलेली तब्बल ५५ हजार रुपयांची देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आतच जप्त केली. या प्रकरणातील दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी दारू चोरीची कबुली दिल्याची माहिती आहे.
चोरलेली दारू २४ तासांच्या आत हस्तगत!
ठळक मुद्देअकोट फैल पोलीसांची कारवाईदोघांना घेतले ताब्यात