शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ‘एलटीए ’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:43 IST

बड्या अधिकाºयांचे किाही भत्ते आणि प्रवास रजा (एलटीए) बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

- सचिन राऊत

अकोला : राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या वर्ग एक आणि दोनच्या अधिकाºयांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला असून, या बड्या अधिकाºयांचे किाही भत्ते आणि प्रवास रजा (एलटीए) बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या या अधिकाºयांना दोन वर्षातून मिळणारे २४ हजार आणि ४ वर्षातून मिळणारे ४८ हजार रुपयांचा भत्ता मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील सर्वच शासकीय आणि खासगी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तब्बल तीन महिने एसटी बसेस बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळालाही कोट्ट्यवधींचा फटका बसला. या आर्थिक संकटात फसलेल्या एसटीच्या चाकांना पुन्हा गती देण्यासाठी परिवहन महामंडळाने काटकसरीचे धोरण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग एक आणि दोन या पदावर असलेल्या अधिकाºयांना दरवर्षी मिळणारी प्रवासी रजा आणि चैनीचा भत्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या राज्यातील ५०० पेक्षा अधिक अधिकाºयांना याचा फटका बसणार आहे. या भत्त्यामध्ये महामंडळातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना सहलीसाठी सहकुटुंब जाण्याकरिता दोन वर्षाला २४ हजार रुपये आणि रजा देण्यात येत होती तर चार वर्षांसाठी ४८ हजार रुपये भत्ता आणि रजा मिळत होती; मात्र आता कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक नुकसान झालेल्या एसटी महामंडळाने एक-एक खर्च कमी करून यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आता यापुढे प्रवासासाठी असलेला चैनीचा भत्ता आणि सहकुटुंब फिरण्यासाठी देण्यात येत असलेली रजा मिळणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. राज्यातील ५७८ अधिकाºयांना फटकाराज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन या पदावर राज्यात तब्बल ५७८ अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाºयांना सहकुटुंब फिरण्यासाठी २४ हजार रुपये देण्यात येतात. यावर तब्बल कोट्ट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या संकटात या रजा बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. या प्रवासी रजेसोबतच यासाठी मिळणारा भत्ताही बंद करण्यात येणार असल्याने राज्यातील ५७८ अधिकाºयांना कोरोनाचा चांगलाच दणका बसल्याची माहिती आहे; मात्र त्यामुळे महामंडळाला नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

 

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला