शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

स्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:16 IST

अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही.

- राजेश शेगोकार

अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. सध्या भाजपा, शिवसेना युतीची स्थिती अशीच आहे. केंद्रात भाजपाला ‘अच्छे दिन’ आल्याबरोबर राज्यात भाजपाने शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देणे सुरू केले. अखेर राज्यात सत्तेत सेनेचीच साथ घ्यावी लागली; संपूर्ण साडेचार वर्षाच्या कालावधीत या दोन पक्षातील संबंध ताणल्या गेले अन् आता भाजपाची हवा खराब झाल्यावर पुन्हा युतीसाठी शिवसेनेची मनधरणी होऊन एकत्रित घोषणा झाली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वºहाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतला असता पक्षीय मतभेद बाजूला ठेवत अनेक अभद्र युती,आघाडी सध्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशा अभद्र समीकरणाचा गुंता निवडणुकीच्या आधी संपणार आहे का? हा प्रश्नच आहे.पश्चिम वºहाडातील बुलडाणाअकोला या दोन जिल्हा परिषदांमध्ये सध्या एकमेकांच्या विरोधात तेल लावून मैदानात उतरण्याची तयारी करीत असलेले पक्ष एकत्रित नांदत आहेत. अकोला जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता आहे. या जिल्हा परिषेदवर भगवा फडकविण्याचा चंग गेल्यावेळी शिवसेनेने बांधला होता; मात्र ऐनवेळी हाराकिरी झाल्याने सेनेतच वादळ उठले अन् भारिपची सत्ता अबाधित राहिली. भारिपकडे २३ सदस्य संख्या होती. त्यामध्ये एका अपक्षासह राष्टÑवादीच्या सदस्याची भर पडून भारिपची सदस्य संख्या २५ झाली. सत्ता स्थापनेसाठी भारिपने राष्टÑवादी व काँग्रेसची साथ घेतली. राष्टÑवादीच्या एकमेव सदस्याला थेट अर्थ व शिक्षण सभापतीपद देऊन भारिपने आपली पकड मजबूत केली. एकमेव सदस्याच्या पाठिंब्याने का होईना; पण सध्या भारिप-राष्टÑवादी अशी सत्ता जिल्हा परिषदेत आहे. भारिपचे सर्वेसर्वा अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक सभेत राष्टÑवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना ठोकून काढत असतानाही जिल्हा परिषदेतील राष्टÑवादीचा टेकू मजबूतच आहे.बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपाला राष्टÑवादीचे पाठबळ मिळाले असून, येथे शिवसेना विरोधात आहे. विशेष म्हणजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, सेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, व राष्टÑवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे लोकसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते. भाजपा, सेना युती झाल्याने प्रतापराव जाधव यांना बळ मिळाले असले तरी सेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर ठेवण्याचा भाजपाच डाव होता. त्याला राष्टÑवादीने लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी साथ दिली. बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे हेच राष्टÑवादी काँग्रेसचा एकमेव असे प्रबळ नेतृत्व आहे. ते आता लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकण्यासाठी तयारी करीत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्तेचा वाटा सोडण्यासाठी भाजपा पुढाकार घेणार की राष्टÑवादी?

 

अकोला जिल्हा तेल्हारा नगरपालिका-भाजपा/राष्टÑवादी काँग्रेसपातूर नगरपालिका-काँग्रेस/भाजपामूर्तिजापूर नगरपालिका- भाजपा/राष्टÑवादी काँग्रेसबाळापूर पंचायत समिती- भारिप/काँग्रेसबार्शिटाकळी नगरपंचायत-काँग्रेस/भाजपबार्शिटाकळी पंचायत समिती-भारिप-काँग्रेस 

बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती मोताळा :- काँग्रेस-शिवसेना युती लोणार :- शिवसेना-राष्ट्रवादीसिंदखेड राजा:- राष्ट्रवादी- भाजप चखली :- काँग्रेस-सेना बुलडाणा:- काँग्रेस-भारिप वाशिम जिल्हा मंगरुळपीर न.प.-भारिप-भाजप मालेगाव नगर पंचायत- राष्ट्रवादी-शिवसेना कारंजा पंचायत समिती -शिवसेना-काँग्रेस

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिम