शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 25, 2017 02:16 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना- भाजप एकत्र येणार?

बुलडाणा, दि. २४- जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २४ जागा मिळविल्या असल्या, तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमताकरिता भाजपला अजून आठ जागांची गरज असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचा निकाल भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी धक्कादायक ठरला. भाजप वगळता एकाही पक्षाच्या जागा वाढल्या नसून, कमी झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६0 असून, बहुमतासाठी ३१ सदस्य असणे आवश्यक आहे. भाजपला २४ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना सात सदस्यांची गरज आहे. शिवसेनेला १0 जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजप अन्य कोणताही पर्याय निवडण्याऐवजी शिवसेनेचा पाठिंबा घेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनाही अनेक वर्षे विरोधात असल्यामुळे सत्तेत सहभागी होण्याकरिता आसुसली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावेळी भाजप व शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलाकरिता आरक्षित झाले आहे. त्यामुळे आरक्षण लक्षात घेऊनच अनेक ओबीसी महिलांनी निवडणूक लढविली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या ओबीसी महिलांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. जिल्हा परिषदेत भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या ओबीसी महिला सदस्यांची अध्यक्ष पद मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून श्‍वेता महाले, मालूबाई मानकर, रूपाली काळपांडे, जयश्री टिकार, उमाताई तायडे या ओबीसी महिला विजयी झाल्या आहेत. गड आला पण सिंह गेला!गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत सातपैकी सात जागांवर यश संपादन करता आले. त्याचवेळी पंचायत समितीवरदेखील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र, त्याचवेळी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शांताराम बोधे हे पंचायत समिती गटात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपची अवस्था ह्यगड आला पण सिंह गेलाह्ण अशी झाल्याची चर्चा दिवसभर जिल्हात होती. असाही योगायोग!नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी ह्यमानकरह्ण या नावानेच म्हणजेच प्रभाग क्रमांक १ मधील भाग्यश्री विक्रम मानकर यांच्यापासून भाजपच्या विजयाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच्या विजयाची सुरुवात मानकर याच नावाने झाली. जिल्हा परिषद गटात मालुबाई ज्ञानदेवराव मानकर या सर्वप्रथम विजयी झाल्या. पालिकेत भाग्यश्री यांच्यामुळे, तर जिल्हा परिषदेत मालुबाई यांच्या रुपाने भाजपला ह्यपरिवर्तनाह्णचा ह्यमानह्ण मिळाल्याची चर्चा आहे.