शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

दवाखाने सुरु करा; अन्यथा सेवा अधिग्रहित करु : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 10:34 IST

खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पयार्याचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स आपले दवाखाने, रुग्णालये सुरु ठेवतील असे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा या आपत्तीच्या प्रसंगी खाजगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, रुग्णालये तात्काळ सुरु करुन कोरोना संसर्ग प्रतिबंधाची उपाययोजना करुन रुग्णसेवा सुरु ठेवावी,अन्यथा खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पयार्याचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी झालेल्या डॉक्टर्सच्या बैठकीत दिला.जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सने त्यांच्या सेवा सुरु करुन समाजात दिसणारे संशयित कोवीड रुग्ण ओळखून ते शासकीय रुग्णालयांकडे तात्काळ पाठवावे यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक आय एम ए या डॉक्टर्सच्या संघटनेसमवेत झाली.या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे मेतकर तसेच अन्य अधिकारी व आय एम ए या संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

डॉक्टरांनी मांडल्या समस्याया बैठकीत सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या. तसेच त्यांनी केलेल्या सुचना व त्यांच्या समस्याही मांडण्यात आल्या. यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरु करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स सुरक्षा द्यावी , प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत निर्माण होणाºया अडचणी याबाबत समस्या मांडल्या. त्यांच्या समस्यांच्या तांत्रिक बाबींबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. या सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय