शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात खासगी संस्थेला दिलेले एसटी पार्सलचे काम बंद; एसटीने सुरु केली सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:14 IST

बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत  कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाने स्थापनेपासून कार्यरत असलेली पार्सल सेवा २०१२ मध्ये एका संस्थेस चालविण्यास दिली होती.  यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १० ठिकाणी खाजगी संस्थाकडे पार्सल सेवा देण्यात आली होती. गत चार दिवसांपूर्वी कराराचा भंग केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाने पार्सल सेवेचा करार रद्द केला. 

बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत  कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या  संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे.जिल्ह्यात दहा ठिकाणी कंत्राटीपद्धतीने यापूर्वी ही सेवा सुरू होती. मात्र ती बंद करण्यात आल्याने आता एसटी महामंडळाचे काम वाढले असून यंत्रणा सुरळीत होईस्तोवर व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांची काही काळ अडचण होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाची १९४८ मध्ये स्थापना झाली तेव्हापासून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी धावत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाकडून अविरत पार्सल सेवाही देण्यात येत आहे.  पार्सल सेवेच्या अनुषंगाने  पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल कर्मचारी कार्यरत होते. सुरूवातीपासूनच भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेकडे बघीतले जात होते. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण करून महामंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेली पार्सल सेवा २०१२ मध्ये एका संस्थेस चालविण्यास दिली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १० ठिकाणी खाजगी संस्थाकडे पार्सल सेवा देण्यात आली होती. परंतू गत चार दिवसांपूर्वी खासगी एजन्सीने कराराचा भंग केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाने पार्सल सेवेचा करार रद्द केला. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील अनेक ठिकाणची सेवा बंद झाली आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील दहा ठिकाणचे खासगी संस्थेचे पार्सल बंद झाले आहेत. त्यामुळे खाजगी संस्थेकडे असलेली पार्सल सेवा आता एसटी महामंडळाकडून चालविल्या जात आहे. पार्सलची सेवा एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्याने एसटी कर्मचाºयांच्या कामात भर पडल्याचे दिसून येत आहे.  कुरिअर वाल्यांची चांदीआतापर्यंत खाजगी एजन्सीमार्फत होणारी पार्सल सेवा अचानक बंद पडल्याने व्यावसायिक खासगी कुरिअर (पार्सल) सेवेची मदत घेत आहेत. बंद पडलेली ही सेवा सध्या एसटी महामंडळाकडूनच पुरविल्या जात असल्याची माहिती अनेक व्यापाºयांना नाही. त्यामुळे नवीन पार्सल पाठविणारे खासगी कुरिअरकडे जात असून, यात कुरिअर वाल्यांची चांदी होत आहे. 

 खाजगी संस्थेची पार्सल सेवा एसटी महामंडळाने काढून घेतली आहे. त्यामुळे  सध्या पार्सल पाठविणाºयांना अडचणी जावू नये, यासाठी पार्सलची सेवा एसटीकडून चालविल्या जात आहे. यावर लवकरच वरिष्ठस्तरावर निर्णय होईल. - ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ