शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:23 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हायटेक होत आॅनलाइन स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र तिकीट वितरण करणाऱ्या मशीनमध्ये ती प्रक्रिया अपडेट न झाल्याने एसटी वाहकांमध्ये संभ्रम आहे.

- संजय खांडेकर

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हायटेक होत आॅनलाइन स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र तिकीट वितरण करणाऱ्या मशीनमध्ये ती प्रक्रिया अपडेट न झाल्याने एसटी वाहकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक सवलतधारकांना सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. परंपरागत पद्धतीने कामाची सवय असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्याची गरज भासत आहे.मागिल वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिक, मासिक पास, स्वातंत्र्य सैनिक, एसटी कर्मचारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, आमदार यांना मॅन्युअल एसटी कार्ड दिले जायचे. हे कार्ड दाखविले की, एसटी वाहक त्याची नोंद घेत असे. त्यातही अनेकदा ही सेवा या गाडीत नाही म्हणून सवलतधारकांना सेवा नाकारली जायची. यातून मार्ग काढून महामंडळाने आॅनलाइन हायटेक प्रणालीचा अंमल सुरू केला अन् राज्यभरात स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मागिल महिन्यापासून डेपोनिहाय स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यासाठी प्रत्येक डेपोतील ज्येष्ठ नागरिक, मासिक पास, स्वातंत्र्य सैनिक, एसटी कर्मचारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, आमदार यांची नोंद आॅनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. संपूर्ण राज्यातील सवलतधारकांना आता स्मार्ट कार्ड दिले जात असले तरी एसटी वाहक यापासून अनभिज्ञ आहे. हे कार्ड चालत नाही, दुसºया बसगाडीत बसा, असा सल्ला प्रवाशांना दिल्या जात आहे. त्यामुळे पासधारकांना सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. महामंडळाने विभाग स्तरावर एसटी कर्मचाºयांची कार्यशाळा घेऊन त्यातून धडे देण्याची गरज आहे, अन्यथा यातून तक्रारी, वाद उद्भवण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.- स्मार्ट कार्ड वितरणासोबतच राज्यातील वाहकांच्या मीटर मशीनवर अ‍ॅप अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहकांना याबाबत माहिती नाही. मीटर अपडेट झाल्यानंतर चालक-वाहकांना याबाबत अवगत करण्याबाबतही मोहीम राबविली जाणार आहे.-चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, म.रा.मा.प.वि.अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी