अकोला : लोकमत सखी मंच आयोजित ह्यटूर चले हमह्ण सहलीला लोकमत वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत काश्मीर सहल, दाजिर्लिंग, गंगटोक व नैनिताल सहल लोकमत सखी मंचतर्फे काढण्यात आली होती. ज्यात सखी मंच सदस्यांसोबतच इतर लोकमत वाचक यांनीदेखील या संधीचा लाभ घेत उत्कृष्ट पद्धतीने आयोजित सहलीचा लाभ घेतला व सखी मंचचे आभार मानत आपले मनोगत सांगितले व उपक्रमास धन्यवाद देत अशा प्रकारच्या सहली भविष्यातही आयोजित कराव्या, अशी विनंती केली.सखी मंच आयोजित सहलीमध्ये उत्कृष्ट नियोजनासह राहण्याची व्यवस्था, जेवण, परिसराची ओळख, प्रवास व्यवस्था उत्तम दर्जाची होती, अशी प्रतिक्रिया सहलीमध्ये सहभागी कुटुंबीयांनी दिल्या. सर्वच सख्यांनी लोकमत सखी मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले व दरवर्षी आयोजनाची अपेक्षा व्यक्त केली. व सर्वांनीच या सहलीचा आनंद एकदा तरी घ्यावा असे मत मांडले.
‘टूर चले हम’ सहलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: July 4, 2014 00:37 IST