शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:35 IST

तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यात गावागावांतील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या व्यथातेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अडसूळ फाटा येथून ती दहीगाव येथे आल्यावर मोठी सभा झाली. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर यात्रा  दुपारी  थार, गाडेगाव, बेलखेड येथे गेली. तेथेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन व चर्चा पार पडली. चितलवाडी, अडगाव बु., येथे संध्याकाळी चर्चासत्र होऊन नंतर सवाद यात्रा अकोट येथे गेली. या यात्रेतील सभांमध्ये अनिल गावंडे यांनी भारताच्या ६,४0,८६७ खेड्यात आजही ६0 टक्के जनता राहते. या जनतेचा प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक उद्योग हाच व्यवसाय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांत आपण ग्रामीण भागाच्या प्रगतीचा आलेख अभ्यासला, तर तो उणेच दिसेल. शेती आणि शेतकर्‍यांच्या शोषणात या प्रश्नाचे मूळ आहे. पण, या सोबतच अजून खूप सारे ग्रामीण भागातील प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहेत. ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतकरी अजून कोणकोणते  शेतीविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, यापासूनही अनभिज्ञ आहेत. आज आमची शेतकर्‍यांची मुलं शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून घरी बसली आहेत. आमच्या मुली बसच्या पासला १000 रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. कित्येक गावाचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकारणामुळे वर्षानुवर्षे स्थगित आहेत. तेव्हा ग्रामीण भागासाठी तळमळ असलेल्या प्रत्येक माणसाला आज एकत्र येऊन पुन्हा ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची गरज आहे आणि तेच काम संवाद यात्रेद्वारे करणार आहोत. या प्रवासात आम्ही विदर्भातील पाच जिल्ह्यातील किमान ५0 गावे आणि गावकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार आहोत. यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मांडण्यात येतील, असे सांगितले. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान अभिजित फाळके, अनिल गावंडे, ललित बहाडे, पुरुषोत्तम आवारे पाटील,  अँड.  सुधाकर खुमकर,  डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे उपस्थित होते.