शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:18 IST

विदर्भ पाटबंधारे विकास  महामंडळाने खापाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घे तला आहे. त्यासाठीचा आढावाही महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी रविवारी  घेतला. कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची आदेश  त्यांनी कंत्राटदार आस्थापनेला दिले.

ठळक मुद्देखारपाणपट्टय़ातील प्रकल्प‘व्हीआयव्हीएम’ कार्यकारी संचालकांनी घेतला आढावा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शापित खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्पाची कामे रखडली असून, या  भागात गोडे पाणीच उपलब्ध नसल्याने शेती उत्पादनावर तसेच सामाजिक, आर्थिक  जीवनावर परिणाम झाल्याचे दिसत आहेत. म्हणूनच विदर्भ पाटबंधारे विकास  महामंडळाने खापाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घे तला आहे. त्यासाठीचा आढावाही महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी रविवारी  घेतला. कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची आदेश  त्यांनी कंत्राटदार आस्थापनेला दिले. खारपाणपट्टय़ातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. आरोग्यासाठी घातक  असलेले हे पाणी पिकांवर परिणाम करणारे असल्याने या भागात धरणे व्हावीत,  असे सातत्याने प्रयत्न झाले; पण या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली  खडक नसल्याने धरण होऊ शकत नाही, असे सातत्याने जलसंपदा विभागाच्या  विविध तज्ज्ञ समित्यांकडून सांगण्यात येत होते. यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान  वापरण्याचे ठरले. सुरुवातीला नेर धामणा बॅरेजचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय  निविदा काढण्यात आल्या. अखेर राज्यातीलच कंत्राटदाराला हे काम देण्यात आले  असून, मागील आठ वर्षांपूर्वी या बॅरेजच्या कामाची सुरुवात करण्यात आली. खार पाणपट्टय़ातील हे पहिले बॅरेज आहे, जे डायफाम वॉलवर उभे करण्यात आले.  सध्या या बॅरेजचे काम थंड बस्त्यात पडले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात  येणार्‍या नेर धामणा बॅरेजनंतर खारपाणपट्टय़ात बॅरेजची शृंखला तयार करण्यात  आली; पण ही सर्व कामे बंद पडली होती. यानुषंगाने रविवारी विदर्भ पाटबंधारे  विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता संजय  घाणेकर, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी नेर धामणा बॅरेजसह बाळापूर  तालुक्यातील कवठा व नया अंदुरा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला.त्यांच्यासोबत  आमदार बळीराम सिरस्कार,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे  होते.कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी  कंत्राटदार आस्थापनेला दिली. नेर धामणा हा मोठा बॅरेज असून, या बॅरेजच्या  पुढच्या कामासाठी ३00 कोटींच्यावर रक्कम लागणार असल्याने सुधारित  प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. सनदी सचिवस्तरीय अधिकार्‍यांच्या त्रिसदस्यीय  समितीने यासाठीची शिफारस केली असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सु प्रमा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे कामही  लवकरच मार्गी लागणार असल्याचे वृत्त आहे.

 खारपाणपट्टय़ातील बॅरेज, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असून,  कवठा बॅरेजचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नया अंदुरा, नेर  धामणाचेही काम पूर्ण केले जाईल. त्यासाठीचा सुप्रमा डिसेंबरच्या शेवटच्या  आठवड्यात मिळणार आहे. अविनाश सुर्वे, कार्यकारी संचालक,व्हीआयव्हीएम, नागपूर.

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज