नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 08:02 PM2017-11-17T20:02:01+5:302017-11-17T20:12:16+5:30

पूर्णा नदीवरील पूर्णा बॅरेज प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्‍यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या प्रकल्पाची किंमत ८८२ कोटीच्या घरात पोहोचली असून अजुनही हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने प्रकल्पामागील उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते.

Ner Dhamaa Project is worth 890 crores! | नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर!

नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटीप्रकल्पाचे ८0 टक्के काम पूर्ण : पूर्णत्वाची अजुनही प्रतीक्षाच

अनिल अवताडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : पूर्णा नदीवरील नेर धामणा प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्‍यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या प्रकल्पाची किंमत ८८२ कोटीच्या घरात पोहोचली असून अजुनही हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने प्रकल्पामागील उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते.
पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात हा प्रकल्प येत असून या प्रदेशातील भुगर्भातील पाणी हे क्षारयुक्त व खारे असल्याने पिकांच्या सिंचनाकरिता विहिरीद्वारे किंवा कूपनलिकेद्वारे वापर करण्यात येत नाही. या प्रकल्पाशिवाय सिंचनाचे दुसरे कुठलेही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे सिंचन आयोगाच्या शिफारशीनुसार या खारपाणपट्ट्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील, या उद्देशने प्रकल्पाचा पाणीसाठा ८.१७९ द.ल.घ.मी. असून त्याद्वारे २७.५८५ द.ल.घ.मी. पाणी वापर प्रस्तावित आहे. त्याद्ववारे ६ हजार ९५४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणर असून भुजल पातळीमध्ये वाढ होणार आहे. पिण्याच्या पाण्याकरिता १.२२ द.ल.घ.मी. आरक्षण आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटून लाभक्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ होईल. गोड पाण्यामुळे व त्याच्या वापरामुळे काही भागातील खारेपणा कमी होण्यास मदत होईल व परिसरामध्ये रोजगार निर्मिती होईल, असे या प्रकल्पापासून फायदे असल्यामुळे या प्रकल्पाला संबंधित विभागाकडून ऑक्टोबर २00८ मध्ये मंजुरात मिळून प्रकल्पाची किंमत १८१.९९ ठरली. त्यानंतर प्रकल्पाच्या किमतीत संकल्प चित्रातील बदल अधिक दराने निविदा स्वीकृती, अनुषंगीक खर्चातील वाढ इ. कारणामुळे वाढ झाल्याने सन २0१0-११ मध्ये दरसुचीवर आधारित ६३८ कोटी ३४ लाख या किमतीस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच प्रकल्पाचे रुपये ८८८.८१ कोटी किमतीचे द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचे अंदाजपत्रक राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांचेकडून तांत्रिक तपासणी झाली असून प्रस्ताव सचिव स्तरावरील त्रिसदस्यीय समितीकडे सादर करण्यात आला. प्रकल्पाकरिता ३५.९४ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत सरळ खरेदीद्वारे २२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. 

Web Title: Ner Dhamaa Project is worth 890 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.