शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नायगावातील दारू अड्ड्यांवर विशेष पथकाची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:20 IST

एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथील फरिदा नगरमध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. या गावठी दारू अड्ड्यांवरून एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांचे पथक रविवारी रात्री उशिरा अकोला शहरात अवैद्य धंद्यावर छापा करण्यासाठी गस्तीवर असताना त्यांना फरिदा नगर नायगाव येथे दोन ठिकाणी गावठी दारू अड्डे सुुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून फरिदा नगर येथे छापा टाकून हुसेन बुद्दू नौरंगाबादी (३२) रा. फरिद नगर नायगाव, शकिल ईब्राहीम परसुवाले (२५) रा. फरिदा नगर नायगाव तसेच जमिला महेबुब भैरोवाले रा. जाम मोहल्ला गवळीपुरा या तिघांना गावठी दारू गाळत असताना रंगेहात अटक केली. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्यानंतर त्यांच्याकडून एकूण २२० लीटर गावठी हातभट्टीची दारू किंमत २२ हजार रुपये, १५ टिनाचे व प्लास्टिकच्या ड्राममध्ये मोहामाच सडवा ३ हजार लीटर किंमत २ लाख रुपये, गावठी दारू उपयोगी गूळ, तुरटी तसेच साहित्य किंमत ११ हजार रुपये असा एकूण २ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तीनही आरोपींविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ६५ (ई) (क) (ड) (फ) आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह कलम १८८, २६९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभाग झोपेतज्या विभागावर गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आहे, तो अकोल्यातील उत्पादन शुल्क विभाग सपशेल झोपेत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी रामदासपेठ पोलिसांनी एका गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. त्यानंतर रात्री पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने मोठ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त केला. अवैधरीत्या गावठी दारू अड्डे सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाने एकही कारवाई न केल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला