शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

माळेगाव बाजारातील जुगारावर विशेष पथकाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:23 IST

आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील माळेगाव बाजार या गावात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी शनिवारी दुपारी छापा टाकून आठ जुगार यांना रंगेहाथ अटक केली. दोन जुगारी फरार होण्यात यशस्वी झाले असून या जुगारींकडून तब्बल १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.माळेगाव बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे बहाकर यांनी पथकासह माळेगाव बाजार येथील जुगारावर छापा टाकून जेठमल दामोदर गांधी रा. दानापूर, अनिल महादेव रावणकर, रा काकनवाडा, दयाराम इश्राम सावळे रा. माळेगाव, जाफरखान हबीब खान रा माळेगाव, राजाराम इश्राम सावळे रा, माळेगाव, शेख राजीक शेख सुभान रा. माळेगाव, प्रवीण जानकीराम काळे रा. माळेगाव, जगन्नाथ रघुनाथ आढाव रा. काकनवाडा, जिल्हा बुलढाणा या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या जुगार अड्डयावरून एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी