लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुने शहरातील तथागत नगरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याजवळून पाच हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी कैलास जनार्दन काटकर (४०, रा. शिवसेना वसाहत), महम्मद रहमान मोेहम्मद इब्राहीम (३०, रा. देशमाने प्लॉट), शंकर रमेश नागे (२२, रा. शिवसेना वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींकडून रोख ३ हजार ५० रुपये, २ मोबाइल २ हजार २०० रुपये असा एकूण ५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
जुगारावर विशेष पथकाचा छापा
By admin | Updated: May 24, 2017 01:40 IST