शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:40 IST

सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढतच असून, सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये महाबीज आणि इतर विविध खासगी बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे कृषी विभागामार्फत सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची मदत मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खासगी कंपन्यांकडून भरपाईवर प्रश्नचिन्ह!शासनाच्या निर्देशानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्यासंदर्भात ‘महाबीज’कडून कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी; खासगी बियाणे कंपन्यांकडून मात्र शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना खासगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२,४७३ तक्रारी; पंचनामे ४३०!४अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या २ हजार ४७३ शेतकºयांकडून ६ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ ४३० शेतकºयांच्या तक्रारींचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात पंचनामे करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी