शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अकोला जिल्ह्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:32 IST

अकोला : एक आठवड्यानंतर २६ जून रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.

अकोला : एक आठवड्यानंतर २६ जून रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पहिल्या टप्प्यात शेतकºयांनी कापूस पेरणीला प्राधान्य दिले. शेतकºयांना आता सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, कृषी विभागाने यावर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी १ लाख ६५ हजार हेक्टर कापूस व तेवढेच सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७ हजार ६५० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार २४२ हेक्टर कापूस असून, २४२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुका वगळता अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व अकोला तालुक्यात कपाशीची पेरणी करण्यात आली. पातूर तालुक्यातही शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली. १ लाख ६५ हजार हेक्टर उद्दिष्टापैकी आतापर्यंत २४२ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली. कृषी विभागाने जिल्ह्याला यावर्षी बियाण्याची पूरक तजवीज केली. यामध्ये कपाशी बियाण्यांची ७ लाख २० हजार पाकिटांची नोंदणी करण्यात आली होती. बाजारात त्यापैकी ५ लाख ३ हजार ६४२ संकरित पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. शेतकºयांनी ही संकरित पाकिटे खरेदीला सुरुवात केली. सोयाबीनचे उद्दिष्ट यावर्षी कापसाएवढेच म्हणजे १ लाख ६५ हजार आहे. या क्षेत्राची गरज बघून जिल्ह्याला ७० हजार क्ंिवटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्षात मागणी ही ५० हजार ५०० क्ंिवटलची होती. त्यामुळे यावर्षी तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यावर्षी तुरीचे १५ हजार ५० क्ंिवटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. मुगाचे १३ हजार क्ंिवटल बियाणे उपलब्ध असून, उडिदाचे १० हजार ९५ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहेत. यावर्षी ज्वारीचे ६०४ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहेत. पावसाचे चित्र बघता ज्वारीसह पेरणी फायदेशीर ठरू शकते. खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी नियोजन केले. तथापि, प्रत्यक्षात पेरणी किती होते, यावर अवलंबून आहे.

- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र मोठे असल्याने यावर्षी कृषी विद्यापीठाच्या मुख्य बीजोत्पादन व मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत पावसाच्या अगोदरच काही क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. बुधवारी पाऊस आल्याने गुडधी, पश्चिम विभाग क्षेत्रावर पेरणी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी