शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेल्या बियाणे, रोपांचा करा कीटकांपासून बचाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:52 IST

शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.

अकोला : विदर्भातील बहुतांश भागात खरीप पिकाची पेरणी झाली असून, पेरलेल्या बियाण्यावर रोपावस्थेत विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामध्ये विविध पक्ष्यांसह खार, वाणी, नाकतोडे, वायरवर्म (काळी म्हैस) इत्यादींपासून बियाण्याचे नुकसान होत आहे. शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.शेतात पेरलेले महागडे बियाणे पक्ष्यांसह उंदीर व विविध प्रकारच्या कीटकांपासून फस्त होत आहे. या किडी बहुभक्षी असून, त्यांचा एकदल, द्विदल, डाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. पक्षी विशेषत: कमी ओलाव्यात बियाणे व्यवस्थित खोलीत न पडल्यास किंवा बियाणे व्यवस्थित झाकले न गेल्यास ते दाणे वेचून खातात. तर खार दाणे उकरून खाते. पावसाळ्यात सुरुवातीला वाणीचे समूह शेतात दिसतात. वाणी रोपट्यांच्या बुंध्याशी डोके खुपसून आत शिल्लक असलेला दाणा खातात. कालांतराने अशी रोपे सुकतात. वाणी ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. याशिवाय जमिनीवरील नाकतोडे रंगाने काळे असून, ते कमी अंतराच्या उड्या मारतात व जमिनीतील दाणे खाऊन नुकसान करतात. वायरवर्म (काळी म्हैस) ही कीड कोलीओप्टेरा वर्गातील असून, हिच्या अनेक प्रजाती आहेत. या किडींचे प्रौढ (काळी म्हैस) भुरकट ते काळ््या रंगाचे असतात. ही कीड मुख्यत: अळ््या (वायरवर्म) अंकुरलेली दाणे खातात. तर प्रौढ रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडतात, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.असे करा व्यवस्थापन

  • पक्षी व खारीपासून पीक वाचविण्यासाठी शेताची राखण करावी
  • शेतातील वाणीचे समूह गोळा करून नष्ट करावे
  • सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष व किडींची हंगामापूर्वी विल्हेवाट लावा
  • न कुजलेल्या सेंद्रिय खताचा वापर करू नये. त्यामुळे वाणी, वायरवर्मचे प्रजोत्पादन होते
  • नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी धुºयावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करा.
  • जमिनीला भेगा पडल्यास उपलब्धतेनुसार पिकास ओलीत करावे.
टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ