शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सासूचा खून करून जावई झाला फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 20:53 IST

महान येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये येत असलेल्या बिहाडमाथा येथे जावयाने सासूचा खून केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देमहान बिहाडमाथा येथील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : महान येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये येत असलेल्या बिहाडमाथा येथे जावयाने सासूचा खून केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.बिहाडमाथा येथील रहिवासी विधवा महिला प्रमिला भगवान आठवले (४५) यांची मुलगी दीपाली हिचे लग्न आगरा येथील मुन्नेश निमकाडे (३५)  यांच्यासोबत लावण्यात आले असून, दीपाली हिला मुन्नेशपासून दोन मुली झालेल्या आहेत. आरोपी मुन्नेश निमकाडे व दीपाली यांच्यात काही वर्षांपासून पटत नव्हते. मुन्नेश ला दारुचे व्यसन असून, तो दीपालीला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा. या कारणास्तव दीपाली गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन्ही मुलीला घेऊन आगर्‍यावरून माहेरी महान येथे आली होती. आई विधवा असून, घरची परिस्थिती ठीक नसल्याने ती शेतात मजुरी करून आपल्या दोन्ही मुलींचे पालन पोषण करायची. आरोपी मुन्नेश  हा वर्षातून दोन ते तीन वेळा आगर्‍यावरून महानला भेटीसाठी यायचा. इथे आल्यावरसुद्धा तो सासू व पत्नी दीपालीला अतोनात त्रास द्यायचा. चार दिवसांपूर्वी आरोपी मुन्नेश हा महान येथे आला होता.  १२ ऑक्टोबर रोजी रात्री दारू पिऊन तो पत्नी दीपालीसोबत वाद घालीत असता, पत्नी दीपाली घरातून निघून शेजारी गेली असता, मुन्नेशसुद्धा घराबाहेर पडला. घरात केवळ दीपालीची आई प्रमिला आठवले ही झोपलेली होती. रात्री सुरू असलेल्या पावसात मुन्नेश  हा बाहेरून घरात आला असता, त्याने पत्नीच्या रागात सासू प्रमिला आठवले हिच्या तोंडावर, नाकावर लाथा बुक्कय़ांनी वार केल्याने प्रमिलाचा नाक व तोंडातून रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुन्नेश  हा तेथून मध्यरात्रीच पसार झाला.रात्री पाऊस सुरू असल्याने प्रमिलाचा ओरडण्याचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू आला नाही. सकाळी दीपाली घरात गेली असता, तिला आई प्रमिलाचे तोंड साडीच्या पदराने झाकलेले दिसले . तिने तोंडावरील पदर काढला असता प्रमिलाचा चेहरा रक्ताने माखलेला दिसला; परंतु तोपर्यंत प्रमिला आठवलेची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती दीपालीने बाश्रीटाकळी पोलिसांना १३ ऑक्टोबर रोजी दिल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून  मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी मुन्नेश  निमकाडेविरुद्ध गुन्हा दाखल करून बाश्रीटाकळी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

श्‍वानपथक दाखल आरोपीने केलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी बिहाडमाथा, महान येथे श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पीएसआय सोनोने, चव्हाण यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल होता.

टॅग्स :Crimeगुन्हा