शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून मुलाने केली आईची निर्घृण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:19 IST

अकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोमठाणा गावात कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीदरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोमठाणा गावात कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी मुलगा प्रदीप दाभाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसांमध्ये शहरात घडलेली हे दुसरे हत्याकांड आहे.सोमठाणा येथे राहणारा आकाश शांताराम दाभाडे याच्या तक्रारीनुसार त्याची आई वंदना शांताराम दाभाडे हिचा आणि मुलगा प्रदीप दाभाडे याच्या पत्नीचा नेहमीच घरगुती कारणावरून वाद व्हायचा. या वादातूनच प्रदीपची पत्नी ही महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली होती.त्यामुळे त्याच्या मनात अनेक दिवसांपासून आईविषयी राग खदखदत होता. त्याने सोमवारी घरी आल्यावर मध्यरात्री आई वंदना हिच्यासोबत वाद घातला. बोलाने बोल वाढल्यामुळे वाद विकोपाला गेला. अखेर प्रदीप दाभाडे याने आईवर लोखंडी अवजाराने वार करून तिची निर्घृण हत्या केली.घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. कौटुंबिक वादातून प्रदीप दाभाडे याने आई वंदना हिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले.आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला.

 

सोमठाणा येथील हत्याकांडाचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून वंदना दाभाडे हिची हत्या करण्यात आल्याचे समोर आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविली आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.- उमेश माने पाटील,शहर पोलीस उपअधीक्षक

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून