कौटुंबिक वादातून मुलाने केली आईची निर्घृण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:19 PM2019-08-07T14:19:35+5:302019-08-07T14:19:46+5:30

अकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोमठाणा गावात कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीदरम्यान घडली.

Son killed mother in Akola | कौटुंबिक वादातून मुलाने केली आईची निर्घृण हत्या!

कौटुंबिक वादातून मुलाने केली आईची निर्घृण हत्या!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोमठाणा गावात कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी मुलगा प्रदीप दाभाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसांमध्ये शहरात घडलेली हे दुसरे हत्याकांड आहे.
सोमठाणा येथे राहणारा आकाश शांताराम दाभाडे याच्या तक्रारीनुसार त्याची आई वंदना शांताराम दाभाडे हिचा आणि मुलगा प्रदीप दाभाडे याच्या पत्नीचा नेहमीच घरगुती कारणावरून वाद व्हायचा. या वादातूनच प्रदीपची पत्नी ही महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली होती.
त्यामुळे त्याच्या मनात अनेक दिवसांपासून आईविषयी राग खदखदत होता. त्याने सोमवारी घरी आल्यावर मध्यरात्री आई वंदना हिच्यासोबत वाद घातला. बोलाने बोल वाढल्यामुळे वाद विकोपाला गेला. अखेर प्रदीप दाभाडे याने आईवर लोखंडी अवजाराने वार करून तिची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. कौटुंबिक वादातून प्रदीप दाभाडे याने आई वंदना हिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले.
आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला.

 


सोमठाणा येथील हत्याकांडाचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून वंदना दाभाडे हिची हत्या करण्यात आल्याचे समोर आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविली आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
- उमेश माने पाटील,
शहर पोलीस उपअधीक्षक

Web Title: Son killed mother in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.