ऑनलाइन लोकमतमूर्तिजापूर (अकोला ), दि. 17 - तालुक्यातील शेलू नजीक येथील रहिवासी तथा दर्यापूर येथे वास्तव्यास असणारे महेंद्र ऊर्फ मनोज भास्करराव खांडेकर हे छत्तीसगड येथे शहीद झाले. व्यायाम करीत असताना ते अचानक खाली कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.महेंद्र खांडेकर हे १९९१ पासून सैन्य दलात कार्यरत होते. सेवा बाँड संपल्यानंतर त्यांना सुभेदार म्हणून बढती मिळाली होती. ते काही दिवसांपासून छत्तीसगड येथे कर्तव्यावर होते. १७ एप्रिल रोजी सकाळी व्यायाम करीत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई पंचफुलाबाई, एक भाऊ, पत्नी संगीता, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. १८ एप्रिल रोजी रांची येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पार्थिव पोहोचणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शेलू नजीक किंवा दर्यापूर यापैकी कोठे करायचे, याविषयी निश्चित झाले नव्हते.
शेलू नजीक येथील जवान छत्तीसगडमध्ये शहीद
By admin | Updated: April 17, 2017 20:34 IST