शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 प्रशासकीय मान्यतेत अडकले सामाजिक न्याय भवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:07 IST

अकोला: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनामार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात आली असली, तरी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरणाअभावी आता साामाजिक न्याय भवन उभारणीचे काम अडकले आहे.

 - संतोष येलकर

अकोला: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनामार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात आली असली, तरी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरणाअभावी आता साामाजिक न्याय भवन उभारणीचे काम अडकले आहे. त्यानुषंगाने गत अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून प्रशासकीय मान्यता आणि निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनामार्फत सन २००७ मध्ये अकोला जिल्ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मंजूर करण्यात आले होते; परंतु जागा उपलब्ध झाली नसल्याने, सामाजिक न्याय भवन उभारणीचे घोंगडे भिजच राहिले. अखेर सन २०१४ मध्ये अकोला शहरातील निमवाडीस्थित पोलीस विभागाच्या ताब्यातील जागेपैकी ४० हजार चौरस फूट जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवनास उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली. गत जून २०१७ मध्ये सामाजिक न्याय भवनाची जागा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी १९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले होते. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शासनाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत गत १५ दिवसांपूर्वी सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी १९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. शासनामार्फत अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली असली तरी, सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून प्रशासकीय मान्यता आणि निधीचे वितरणाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यानुषंगाने अकोल्यातील सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून प्रशासकीय मान्यता आणि निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून १९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या समाजिक न्याय विभागाकडून प्रशासकीय मान्यता आणि निधी प्राप्त झाल्यानंतर समाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.- अमोल यावलीकरसहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक