शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ६० टक्केच सोयाबीन बियाणे बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:10 IST

येत्या मेअखेर सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महाबीजचे म्हणणे आहे.

अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाचे आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात पोहोचले आहे. ३० टक्के मूग, उडीद बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मात्र सोयाबीन बियाणे हवे आहे. येत्या मेअखेर सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महाबीजचे म्हणणे आहे.गतवर्षीचा पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसल्याने हेक्टरी उतारा कमी लागला आहे. पावसाने बियाणे काळे पडले आहे. यामुळे राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे कृषी विभागासह शेतकºयांची चिंता वाढली आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३८ लाख हेक्­टर आहे. महाबीजकडे चार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ज्यात जवळपास ८ ते ९ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. बियाणे कंपन्या किती बियाणे उपलब्ध करतात, यावर अवलंबून आहे. बियाणे उपलब्ध झाले तरी त्याची उगवण क्षमता किती, हे तपासावे लागणार आहे. सध्या तापमान वाढल्याने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता ७० हून ६५ टक्क्यांपर्यंत आली आहे. सद्यस्थितीत ६० टक्के बियाणे महाबीजने उपलब्ध केले. दरम्यान, सोयाबीन बियाण्याची कमतरता भासत असल्याने यावर्षी महाबीजने २५ हजार क्विंटल बियाणे बाहेरून खरेदी करण्यासाठीची निविदा मागविली आहे; पण हे बियाणे अद्याप महाबीजकडे पोहोचले नाही. यावर्षी महाबीजने सोयाबीनचे दर तीन ते चार टक्के वाढविले आहे. आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, वाहतुकीचा प्रश्न असल्याने अगोदर बाहेरच्या गावांना बियाणे पाठविण्यात आले आहे. मेअखेर सर्व बियाण्याचा पुरवठा होईल.-अजय कुचे, महाव्यवस्थापक (विपणन) महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMahabeejमहाबीजFarmerशेतकरी