शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचे जागरण आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:50 IST

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक असल्याने वेळीच जीवनशैली बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.एका अभ्यासानुसार, रात्री झोप नीट न मिळाल्याने किंवा रात्रभर जागरण झाल्याने मनुष्याच्या डीएनएचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी डीएनएच्या रचनेत बदल झाल्यास कर्करोगासह मधुमेह व इतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. बदलत्या जीवनशैलीचा हा सर्वाधिक घातक परिणाम आहे. चुकीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त धोका वयाच्या तिशीनंतर आहे. या बदलांमुळेच कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास हा प्रकार किती धोकादायक आहे आणि रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले.या आजारांचा धोका

  • कर्करोग
  • मधुमेह
  • हृदयाचे विकार
  • मज्जातंतूचे विकार
  • श्वासनलिकेसंदर्भात विकार

नेटकऱ्यांसाठी धोक्याची घंटाबहुतांश तरुणाई रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर व्यस्त असते. रात्री उशिरापर्यंत नेट सर्फिंगमुळे होणारे जागरण आणि अवेळी जेवण हा प्रकार नेटकºयांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच चुकीच्या सवयी बदलून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.निरोगी आरोग्यासाठी हे करा!

  1. किमान सात ते आठ तास झोप घ्या.
  2. रात्री १२ च्या आत जेवण करा.
  3. रात्रीचे जेवण हलके व पचणार असेच घ्या.
  4. पौष्टिक आहार घ्या.
  5. भरपूर पाणी प्या.
  6. मॉर्निंग वॉकची सवय लावा.
  7. नियमित व्यायाम करा.
  8. चुकीच्या सवयी बदला.

रात्रीचे जागरण हे आरोग्यासाठी घातकच आहे. झोप न घेणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे आहे. हा धोका टाळण्यासाठी चुकीच्या सवयी बदला. रात्री बाराच्या आधी जेवण आणि झोपणे आवश्यक आहे. जेणे करून किमान सात ते आठ तासांची झोप होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealth Tipsहेल्थ टिप्स