शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्करी प्रकरणात आरोपीस सहा वर्षांचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:15 IST

न्यायालयाचा निवाडा : आरोप सिद्ध न झाल्याने, तिघांची सुटका

अकोला : गांजा तस्करी प्रकरणात आरोपी मोहम्मद रफिक माेहम्मद हमजा रा. इस्लामपुरा जुने शहर याला ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील एम. पाटील यांच्या न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी सहा वर्षांचा सश्रम कारावासासह ४० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली इतर सहकारी तिघा आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने, न्यायालयाने त्यांची सुटका केली.

पिंजर पोलिस स्टेशनअंतर्गत एपीआय सुनील पी. सोळंके यांना गांजा तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून १३ सप्टेंबर २०२७ रोजी आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा, मंदा शेषराव वानखडे व व्यंकट लक्ष्मी मुसलैय्या रामू हे शेलु बु. गावाकडे येत असताना, त्यांच्याजवळील साहित्याची झडती घेतली असता, मो. रफिक मो. हमजा याच्याकडे ६ किलो ८३२ ग्रॅम गांजा आणि एक मोबाइल, आरोपी मंदा शेषराव वानखडे हिच्याकडून एक मोबाइल जप्त केला.

आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याचे (एनडीपीएस) कलम २० (बी) (आयआय) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपासादरम्यान आरोपी मो. रफिक मो. हमजा याने आरोपी गणपत राधाकिसन कनोजिया याच्यासोबत यापूर्वी गांजा खरेदी व विक्रीचे व्यवहार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली. या प्रकरणात न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी व्यंकट लक्ष्मी मुसलैय्या रामू हिच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने तिला निर्दोषमुक्त केले होते. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने ६ साक्षीदार तपासले. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आनंद गोदे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी खाडे व सीएमएस सेलचे पैरवी श्रीकृष्ण पाचपोर यांनी सहकार्य केले.

असा झाला युक्तिवाद, आरोप सिद्ध न झाल्याने दोघांची सुटकान्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकार पक्षाने असा युक्तिवाद केला की, इतर गुन्हे फक्त एका व्यक्तीबद्दल किंवा कुटुंबाबद्दल असतात. परंतु प्रस्तुत गुन्हा हा समाज विरोधी आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने पुरावे ग्राह्य मानून आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा यास अमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार दोषी ठरवून ६ वर्षे सश्रम कारावास, ४० हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली तर त्याचे सहकारी आरोपी मंदा शेषराव वानखडे व गणपत राधाकिसन कनोजिया यांच्याविरुद्ध सबळ पुरावे व आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोला