शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विकास कामांचा घोळ; सहा वर्षांपूर्वीच्या फायलींचा प्रवास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:54 IST

अकोला: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्या धाकापोटी आजवर बिळात लपून बसलेल्या काही कंत्राटदारांनी सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे करणाऱ्या फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या वित्त विभागात ‘सेटिंग’चे प्रयत्न सुरू केले आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्या धाकापोटी आजवर बिळात लपून बसलेल्या काही कंत्राटदारांनी सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे करणाऱ्या फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या वित्त विभागात ‘सेटिंग’चे प्रयत्न सुरू केले आहेत. यातील बहुतांश कंत्राटदार सत्ताधारी भाजपमधील नगरसेविका, नगरसेवकांचे पुत्र असल्यामुळे प्रामाणिक व पारदर्शी कारभाराचा डंका मिरवणाºया भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकाराची भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी दखल घेतील की संबंधित कंत्राटदारांना मनपाची आर्थिक लूट करण्यासाठी मोकळे रान करून देतील, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या बदलीनंतर २०१२-१३ मध्ये मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यादरम्यान, बांधकाम विभागातील निष्ठावान व प्रामाणिक अभियंत्यांच्या मदतीने काही कंत्राटदारांनी लाखो रुपयांची विकास कामे निकाली काढली. यातील बहुतांश कामे कागदोपत्री करून त्या बदल्यात लाखो रुपयांच्या देयकांच्या फायली तयार करण्यात आल्या. सदर फाइल मंजूर होऊन देयकांसाठी वित्त व लेखा विभागाकडे सादर केल्या होत्या. बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांशी संगनमत करून संबंधित कंत्राटदारांनी विकास कामांचा घोळ केल्याची शंका उपस्थित झाल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित कामांच्या देयकांना फेटाळून लावले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या कालावधीत संबंधित फायली मंजुरीसाठी पुढे सरकविण्यात आल्या; परंतु शेटे यांनीदेखील देयक मंजुरीसाठी नकार दिल्याने कंत्राटदारांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्या गेले. २०१४ मध्ये मनपाची सूत्रे स्वीकारणाºया तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या रोखठोक कार्यशैलीमुळे संबंधित कंत्राटदार, अभियंत्यांनी भूमिगत होणे पसंत केले. हीच परिस्थिती तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या कालावधीत कायम होती. जितेंद्र वाघ यांची बदली होऊन आज रोजी संजय कापडणीस आयुक्तपदाच्या माध्यमातून मनपाचा क ारभार हाकत आहेत. प्रशासनातील काही उणिवा हेरून संबंधित कंत्राटदार पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले असून, त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० पेक्षा अधिक फायलींना मंजुरी मिळावी, यासाठी वित्त व लेखा विभागातील काही ‘दलालां’ना सक्रिय केल्याची माहिती आहे.साडेतीन वर्षानंतर ‘कमबॅक’तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळात कागदावर कामे करून मनपाला आर्थिक चुना लावणारे कंत्राटदार, अभियंता महापालिकेतून गायब झाले होते. अजय लहाने व जितेंद्र वाघ यांच्या खमक्या धोरणामुळे संबंधित फायली वित्त व लेखा विभागात पडून होत्या. या दोन्ही अधिकाºयांची झालेली बदली व विद्यमान आयुक्त संजय कापडणीस यांचे मवाळ धोरण पाहताच भाजपमधील नगरसेविका, नगरसेवकांच्या कंत्राटदार पुत्रांनी साडेतीन वर्षांनंतर मनपात ‘कमबॅक’ केल्याची चर्चा आहे.संगनमताने आर्थिक लूटअवघ्या सहा-सहा महिन्यांत प्रभागातील विकास कामांची वारंवार देखभाल दुरुस्ती करण्याच्या नावाखाली संबंधित कंत्राटदारांनी मनपाची अक्षरश: आर्थिक पिळवणूक केली. मनपाचे तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक, लेखाधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, वित्त व लेखा विभागातील मर्जीतल्या कर्मचाºयांची खिसे जड करून संगनमताने मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची माहिती आहे.आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षबांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंत्याने सर्व निकष, नियम धाब्यावर बसवत कागदोपत्री केलेल्या विकास कामांच्या फायली मंजूर केल्या. हा सर्व प्रकार तत्कालीन प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या कार्यकाळात घडला. २०१८-१९ मधील विकास कामांसाठी ‘जिओ टॅगिंग’अत्यावश्यक करणारे आयुक्त संजय कापडणीस सहा वर्षांपूर्वीच्या थकीत देयकासंदर्भात काय निर्णय घेतात, यावरच मनपाची पुढील वाटचाल स्पष्ट होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका