शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

सहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:26 IST

पातूर : पातूर तालुक्यातील १३ धार्मिक स्थळांपैकी पाच ठिकाणचे लोकांनी ३ ऑक्टोबर रोजी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले व सहा ठिकाणची अतिक्रमणे शासकीय यंत्रणेमार्फत काढण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली.

ठळक मुद्देगौतम कॉलनीतील ओट्याचा वाद चिघळलामहिला पोहोचल्या ठाण्यात दोन ठिकाणची कारवाई बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर तालुक्यातील १३ धार्मिक स्थळांपैकी पाच ठिकाणचे लोकांनी ३ ऑक्टोबर रोजी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले व सहा ठिकाणची अतिक्रमणे शासकीय यंत्रणेमार्फत काढण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली.तालुक्यातील ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील एकूण ६९ जागांवरील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून सन २0१४ व ८ ऑगस्ट २0१७ मध्ये नियमित व निष्कासित करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुषंगाने २५ सप्टेंबर रोजी ६९ धार्मिक स्थळांपैकी ५५ धार्मिक स्थळे नियमित करण्याचे तर १४ स्थळे निष्कासित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार तहसील कार्यालयामार्फत १६ ऑक्टोबर रोजी न. प. तथा ग्रामपंचायती व अन्य विभागास पत्र देऊन नोटीस बजावण्याचे आदेश दिले व संबंधित नागरिकांना नोटीस बजावून आठ दिवसांत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे सूचित केले व १४ धार्मिक स्थळांच्या विश्‍वस्तांना नोटीससुद्धा दिल्या होत्या. त्यांपैकी पातूर-खानापूर रोडवरील पातूर भाग-२ सर्व्हे नं. १८७/३ च्या विश्‍वस्तांनी न्यायालयातून २६ ऑक्टोबर रोजी स्थगानादेश मिळविला. धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याच्या या कारवाईत १३ पैकी ११ स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामधील आसरा माता चबुतरा बोडखा व माळराजुरा शिवार ही दोन स्थळे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असल्यामुळे तेथील अतिक्रमण काढण्याचे राहिले आहे. तसेच गौतम कॉलनीमधील जिराईत पातूर भाग-२ सर्व्हे नं. २१0/९ मधील ओट्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये वकिलामार्फ त तहसीलदार तथा ग्रामसेवक यांना कागदपत्रे दाखविण्यात आली; मात्र अखेर तहसीलदारांनी १0 मिनिटांत अतिक्रमण काढण्याचा आदेश जागेवरच दिल्याने ओटा पाडण्यात आला. त्यामुळे तेथील नगरातील महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. इतर ठिकाणचे अतिक्रमण शांततेत पाडण्यात आले. यावेळी पातूरचे तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी, पं. स. गटविकास अधिकारी शेखर शेलार, ग्रामसेवक राहुल उंदरे व अन्य, तहसील विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव, लेडीज पोलीस त्यांचा स्टाफ व ग्रा.पं. कर्मचारी प्रमोद उगले, अंबादास उगले व अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

शिर्ला येथील तीन जागांवरील अतिक्रमण जमीनदोस्तशिर्ला : येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण ३ ऑक्टोबर रोजी तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार तथा पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्यासह ६0 कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत जेसीबीद्वारे काढण्यात आले. अकोला-पातूर महामार्गावरील नांदखेड ग्रा. पं. हद्दीतील गुणवंत महाराज संस्थान, अण्णाभाऊ साठे क्रांतिभूमी, भारत माता क्रांती आश्रम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. गुणवंत महाराजांची मूर्ती जमा करण्यात आली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, वीर लहूजी साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गजानन दांडगे, प्रभाकर लांडगे यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन अतिक्रमण हटविले.

नागसेन बौद्ध महिला संघाची सरकारी अधिकार्‍यांविरोधात पोलिसात तक्रार गौतम कॉलनीतील ओटयाचे बांधकाम पाडल्याबद्दल नागसेन बौध्द महिला संघांने गौतम कॉलनीत बौद्ध विहाराची  स्थापना झाली असतानाही ग्रामसेवकाने १६ ऑक्टोबरला अतिक्रमण केल्याबद्दल सूचना पाठविली. २३ ऑक्टोबरला महिला संघाने बौद्ध विहार शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आला नाही असे पत्र देऊन कळविले. तरीदेखील ३ नोव्हेंबरला  पातूरचे तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायतच्या सचिवांनी ते खोडसाळपणे पाडले अशी तक्रार दिली. या निवेदनावर महिला संघाच्या अध्यक्ष बेबी रमेश इंगळे, उपाध्यक्षा राजकन्या वानखडे, सचिव सुशीला समाधान गवई, यांच्यासह अनेक महिलांची स्वाक्षरी आहे. 

गौतम कॉलनीमधील पंचशील ध्वज तथा ओट्यास रीतसर १६ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावून व चिटकवून तेथील स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन समन्वयाने पाडण्याबाबत दोन वेळा बैठका घेऊन चर्चा केली व सूचित केले; परंतु ओटा न पाडल्यामुळे आज प्रशासनामार्फत निष्कासित केले.- राहुल उंदरे,ग्रामविकास अधिकारी, शिर्ला.