शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लाडक्या बाप्पाचे हर्षाेल्हासात आगमन..सर्वत्र गणपती बाप्पा माेरयाचा जय जयकार, ढाेल,ताशे, गुलालाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2023 13:34 IST

सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी अकाेला,वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले.

अकाेला: पश्चिम विदर्भात ढाेल,ताशे, गुलालाची उधळण करीत मंगळवारी गणेशाेत्सवाला सुरूवात झाली असून,मनाेभावे विघ्नहर्ता गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जात आहे.

सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी अकाेला,वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत़ अकाेला शहरात क्रिकेट क्लब मैदानावरून आपल्या लाडक्या गणरायाला आणण्यासाठी भाविकांची गर्दी बघावयास मिळाली. गणरायाच्या स्वागतादरम्यान गणपती बाप्पा माेरयाचा जय जयकार, ढाेल,ताशे,पारंपारिक वाद्याने अकाेला शहर निनादून गेले.

मंगळवारी सकाळपासूनच क्रिकेट क्लब मैदान,जठारपेठ,काैलखेड,तुकाराम चाैक, जुने शहर,आदी भागातून घरगुती गणपती आणण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. दुचाकी, चारचाकी वाहने,ऑटाे रिक्षा, हातगाडे, ट्रॅक्टरमधून वाजत गाजत गणरायाचे आगमन होत आहे. 

तगडा पोलिस बंदोबस्तगणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहरातील प्रमुख चौकांसह बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, अकाेला शहरात अपर पोलिस अधीक्षक १, पोलिस उपअधीक्षक ७, पोलिस निरीक्षक २३, सहायक पोलिस निरीक्षक २८, पोलिस उपनिरीक्षक ७१, पोलिस कर्मचारी २०५०, होमगार्ड ७००, एसआरपी प्लाटून २, आरसीपी प्लाटून ४, क्युआरटी प्लाटून १ असा एकूण ३२०० पोलिसांचा फौजफाटा प्रमुख मार्गांसह शहरात तैनात केला आहे.

ड्रोन, सीसी कॅमेऱ्यांद्वारे वॉचगणपती बाप्पाच्या आगमनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये. या दृष्टिकोनातून पोलिस ८ ड्रोन कॅमेऱ्यासह सीसी कॅमेऱ्यांसह आक्षेपार्ह हालचालींवर वॉच आहे. यासोबतच सायबर क्राईम पोलिससुद्धा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ, छायाचित्रांवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Akolaअकोला