लूटमार टॅक्सविरोधात स्वाक्षरी मोहीम : नऊ हजार नागरिकांनी नोंदविला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:05 AM2018-03-05T02:05:31+5:302018-03-05T02:05:31+5:30

अकोला : स्थानीय लूटमार टॅक्स संघर्ष समिती दक्षिण झोनच्यावतीने रविवारी सिंधी कॅम्प चौकात राबविण्यात आलेल्या लूटमार टॅक्सविरोधी स्वाक्षरी आंदोलनात परिसरातील ९७५१  महिला -पुरुष  नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पुढाकर घेतलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मनपा प्रशासनाच्या वाढीव टॅक्स धोरणाचा नागरिकांकडून निषेध नोंदविला गेला.

Signature campaign against robbery tax: Nine thousand people reportedly protested | लूटमार टॅक्सविरोधात स्वाक्षरी मोहीम : नऊ हजार नागरिकांनी नोंदविला विरोध

लूटमार टॅक्सविरोधात स्वाक्षरी मोहीम : नऊ हजार नागरिकांनी नोंदविला विरोध

Next
ठळक मुद्देमदन भरगड यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानीय लूटमार टॅक्स संघर्ष समिती दक्षिण झोनच्यावतीने रविवारी सिंधी कॅम्प चौकात राबविण्यात आलेल्या लूटमार टॅक्सविरोधी स्वाक्षरी आंदोलनात परिसरातील ९७५१  महिला -पुरुष  नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पुढाकर घेतलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मनपा प्रशासनाच्या वाढीव टॅक्स धोरणाचा नागरिकांकडून निषेध नोंदविला गेला. नागरिकांनी फलकावर आणि रजिस्ट्ररमध्ये स्वाक्षरी नोंदवून आपला विरोध प्रकट केला. तत्पूर्वी भरगड यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका आणि नागरिकांच्या प्रतिसादावर भाष्य  केले.
लूटमार टॅक्सविरोधी अभियानाचे समन्वयक माजी महापौर मदन भरगड यांच्या मार्गदर्शनात व दक्षिण झोनचे प्रमुख हरीश कटारिया यांच्या उपस्थितीत सकाळी या लूटमार टॅक्सविरोधी आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी स्वाक्षरी नोंदवून वाढीव कराचा जोरदार निषेध केला. दरम्यान रस्त्यावरील चालत्या बोलत्या नागरिक महिला-पुरुषांनी वाढीव कराच्या संदर्भात  झणझणीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वाढीव कराचा निषेध करीत लूटमार टॅक्सविरोधी अभियानाचे स्वागत केले. हे अभियान महानगरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असल्याचे भरगड यांनी सांगितले. यावेळी रूपचंद अग्रवाल, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, कैलाश देशमुख, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, विजया राजपूत, सीमा ठाकरे, मोहिनी मांडलेकर, सिंधूताई भीमकर, स्माइल टिवीवाले, जावेदखान, मनीष नारायणे, संजीवनी बिहाडे , तम्बोली, विजय मुले, अजय झडपे, उमाकांत कावडे, सोएब, कशिश खान, अभिषेक भरगड, गोपाल शर्मा, देवीदास सोनोने, सुरेशमामा शर्मा, भ्रुमल मुल्लाणी, प्रकाश खबरांनी, मुरलीधर लुल्ला, ज्ञानचंद तलरेजा, प्रकाश सेनानी,  विनोद भाटिया, कोइमल लुल्ला, रमेश जग्ग्यासी, हरीश पटवानी, दीपक जाधवानी, प्रेम आनंदानी, सुरेंद्र नागदेवे, कमल सचदेव, सुरेंद्र नागदेव, गिरधर टकरानी, हरीश आनंदानी, रवी आनंदानी, रवी कटारिया, मनीष टकरानी, राजेश जिवंतरामानी, मुलचंद कटारिया, सत्यप्रकाश घाटोळे, डॉ.प्रेमशंकर तिवारी, विजय शर्मा, सय्यद यासिन उर्फ बब्बू समवेत बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.   
 

Web Title: Signature campaign against robbery tax: Nine thousand people reportedly protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला