शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे वंचित, पीडित महिलांना शिलाई मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:01 IST

राणी पनपालिया, सुनीता चौरे, सुनीता जामोदकर व फागुनी तळोकार यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

अकोला: श्री रामनवमी शोभायात्रा समिती पीडित वंचित व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन अकोला पंचक्रोशीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन माहेश्वरी समाज पक्षाचे अध्यक्ष रमेश चांडक यांनी केले. मोठ्या राम मंदिरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती व आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने १५ महिलांना मातृशक्ती सबलीकरण कार्यक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक ब्रिजमोहन चितलांगे, समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, वसंत बाछुका, उपमहापौर वैशाली शेळके मंचावर विराजमान होत्या.श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने शहरातील विविध स्तरातील महिलांच्या परिस्थितीची पाहणी करून १५ जणांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. त्यामध्ये जयश्री कोलटकर, भारती डोंगरे, दीप्ती वाघमारे, दीपाली भागवत, वर्षा गायगोले, लक्ष्मी तिवारी, नंदिनी मोरे, ममता शाहू, राणी पनपालिया, सुनीता चौरे, सुनीता जामोदकर व फागुनी तळोकार यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. आमदार शर्मा यांच्यावतीने श्री रामनवमी शोभायात्रा समिती संकटसमयी प्रत्येकाला आधार देण्याचे काम जन्मोत्सवासोबत प्रत्येकाच्या घरात आनंद व्हावा, यासाठी कार्यरत राहणार आहे, असे सांगून रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने अजून २१ जणांना मदत देण्यात येण्याची घोषणा केली. यावेळी ब्रिजमोहन चितलांगे, वसंत बाछुका यांनी आपले विचार व्यक्त केले. महिलांच्यावतीने दीप्ती वाघमारे व जयश्री कोल्हटकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आमदार शर्मा यांच्या हस्ते ब्रिजमोहन चितलांगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनिल मानधने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले. आभार गिरिराज तिवारी यांनी मानले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक