शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही राजराजेश्वराला जलाभिषेकाची परंपरा अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:37 IST

सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.

अकोला: कोरोना विषाणूच्या सावटातही शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा यंदा कायम ठेवण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देत श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाची एकमेव मानाची पालखी ‘जय भोले’च्या गजरात अतिशय शिस्तबध्द व शांततेने सोमवारी सकाळी ६ वाजता शहरात दाखल झाली. पोलिस बंदोबस्तात मार्गाक्रमण करीत सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्ष पूर्ण होत आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शहराच्या कानाकोपºयातील शिवभक्त जय्यत तयारी करतात. परंतु यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सोहळा आयोजित न करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाला केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक शहरात दाखल होतात. शिवभक्तांच्या भावना लक्षात घेता ही धार्मिक परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशातुन यावर्षी केवळ श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या मानाच्या पालखीला गांधीग्राम येथे जाण्यासाठी परवानगी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहरातील प्रमुख पालखी व कावड मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे रविवारी 16 जुलैच्या रात्री निवडक 20 शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री राजेश्वराची पालखी गांधीग्रामकडे मार्गस्थ झाली होती. गांधीग्राम येथे पूर्णा नदीची तसेच मानाच्या पालखीची विधिवत पुजा-अर्चना केल्यानंतर राजेश्वर शिवभक्त मंडळाचे सदस्य वाहनाद्वारे सोमवारी सकाळी ६ वाजता अकोटफैल परिसरातील पाचमोरी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित पोलीसांनी पालखीचे स्वागत केले.

टॅग्स :AkolaअकोलाRajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिरIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण