शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

विहीर घोटाळ्याच्या माहितीसाठी पुन्हा कारणे दाखवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 02:11 IST

अकोला :  गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. पातूर, बाळापूर तालुक्यातील सिंचन विहिरीतील घोळ निश्चित करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली. अद्यापही माहिती न आल्याने संबंधित गटविकास अधिकाºयांना सोमवारी पुन्हा नोटीस देत तातडीने माहिती सादर करण्याचे बजावण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर उद्या, १४ मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत आहे. 

ठळक मुद्देसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर आज बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. पातूर, बाळापूर तालुक्यातील सिंचन विहिरीतील घोळ निश्चित करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली. अद्यापही माहिती न आल्याने संबंधित गटविकास अधिकाºयांना सोमवारी पुन्हा नोटीस देत तातडीने माहिती सादर करण्याचे बजावण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनानंतर उद्या, १४ मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत आहे. बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आले. त्यापैकी २७९ आदेशांची पंचायत समिती कार्यालयात कुठेच नोंद नाही. लाभार्थींना मिळालेल्या पत्रानुसार विहिरींचे काम सुरू केले. त्या लाभार्थींना आता देयक न देता अडवण्यात येत आहे. कार्यालयाबाहेर तयार केलेले आदेश देत त्यापोटी लाभार्थींकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार अधिकारी-दलालांनी केल्याचे उघड झाले. त्याचवेळी आदेश कार्यालयाबाहेर असताना त्या लाभार्थींना पहिला, दुसºया हप्त्याची रक्कम पंचायत समितीकडून देण्यात आली. पातूर, बाळापूर तालुक्यातील शेतकºयांची ही समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी सिंचन विहिरी मंजुरीत झालेल्या घोळाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यावर सिंचन विहिरी लाभार्थींची समस्या सोडवण्यासाठी १४ मार्च रोजी सर्वच गटविकास अधिकाºयांची बैठक बोलावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

सिंचन विहिरींचा घोटाळा बाहेर येणार!पातूर, बाळापूर तालुक्यातील विहिरींना मंजुरी, निधी वाटप, गावांतील लक्ष्यांक, त्यानुसार दिलेली मंजुरी, या सर्व बाबींची माहिती आधीही मागवण्यात आली. त्यावेळी संबंधित गटविकास अधिकाºयांनी रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाºयांचा संप असल्याने माहिती देता आली नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर तीन महिने उलटले तरीही माहिती सादर केली नाही. त्यावर उद्या, १४ मार्च रोजीच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा नोटीस बजावत तातडीने माहिती सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी बजावले. उद्याच्या बैठकीत संपूर्ण घोळ बाहेर येण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Akolaअकोला