शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’मुळे दुकानदारांच्या विक्रीत ६० टक्क्यांपर्यंत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:25 IST

अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन पोर्टलचा सर्वाधिक फटका हेडफोन, ब्ल्यूटूथ, पेनड्राइव्ह व मोबाइल फोन विकणाºया दुकानदारांना बसला आहे.एअर कंडिशनर, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर हिटर अशा उपकरणांच्या विक्रीतही १० ते २० टक्के घट वॉलपेपर, झुंबर, लायटिंग सामान यांच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.

अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे. दिवाळीनंतर त्वरित अकोलाबाजारपेठेत ही तपासणी केली. याकरिता गृहोपयोगी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, मोबाइल फोन, तयार कपडे, कापड, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन उत्पादने विकणाऱ्या दुकानदारांकडे चौकशी करण्यात आली. सगळ्याच दुकानदारांनी रेकॉर्डवर बोलण्यास नकार दिला; पण विक्री कमी झाल्याचे प्रत्येकाने खासगीत मान्य केले आहे.आॅनलाइन पोर्टलचा सर्वाधिक फटका हेडफोन, ब्ल्यूटूथ, पेनड्राइव्ह व मोबाइल फोन विकणाºया दुकानदारांना बसला आहे. मोबाइल फोनची विक्री ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे सर्व दुकानदारांचे म्हणणे आहे. यानंतर तयार कपड्यांचा क्रम लागल्याचे निदर्शनास आले. तयार कपड्यांची, विशेषत: पुरुषांची वस्त्रे उदा. शर्टस्, जीन्स, टी-शर्ट, कुर्ता-पायजमा, शेरवानी, सूट यांची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे न्यू क्लॉथ मार्केटमधील अनेक दुकानदारांनी सांगितले. त्या तुलनेत महिलांच्या वस्त्र प्रावरणात फक्त टी-शर्टस्, जीन्स अशा उत्पादनांच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाली आहे. प्रासंगिक वस्त्र प्रावरणे महिला दुकानदारांकडूनच घेतात, अशीही माहिती मिळाली. लहान मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत ही विक्री ५ ते १० टक्के कमी झाली आहे.याचबरोबर गृहोपयोगी वस्तू म्हणजे एअर कंडिशनर, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर हिटर अशा उपकरणांच्या विक्रीतही १० ते २० टक्के घट झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले; मात्र यापैकी बहुतेक उत्पादने सुलभ मासिक हप्त्याने (ईएमआय) घेण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल असल्याने विक्रीत फारशी घट झाली नसल्याचे अकोला बाजारपेठेतील दुकानदारांनी सांगितले. गिफ्ट द्यायच्या वस्तू व गृह सजावटीसाठी लागणाºया वस्तू उदा. वॉलपेपर, झुंबर, लायटिंग सामान यांच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. आॅनलाइन पोर्टलवर मालाचा पुरवठा वेळेवर असल्याने स्टॉक ठेवण्याचा प्रश्न नसतो. त्यामुळे रक्कम गुंतवावी लागत नाही म्हणून आॅनलाइन पोर्टल दुकानदारांपेक्षा स्वस्त किमतीत उत्पादने देऊ शकतात. शिवाय, प्रत्येक वस्तूचा पुरवठादार वेगळा असल्याने ग्राहकांना अधिक डिझाइन उपलब्ध असतात. पारंपरिक दुकानदारांना हे फायदे मिळत नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजारbusinessव्यवसायonlineऑनलाइन